मधुमेहाचे प्रमाण पुरूषांपेक्षा महिलांमध्ये अधिक , तिशीनंतर वाढतो त्रास : मधुमेह दिनानिमित्त जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:01 AM2017-11-15T02:01:28+5:302017-11-15T02:02:35+5:30

ठाणे जिल्ह्यामध्ये आजघडीला मधुमेहाचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक असल्याची बाब जागतिक मधुमेह दिनानिमित्त पुढे आली आहे.

 Diabetes mellitus in women more than men; Increases in tension after birth: Public awareness celebrations during Diabetes Day | मधुमेहाचे प्रमाण पुरूषांपेक्षा महिलांमध्ये अधिक , तिशीनंतर वाढतो त्रास : मधुमेह दिनानिमित्त जनजागृती फेरी

मधुमेहाचे प्रमाण पुरूषांपेक्षा महिलांमध्ये अधिक , तिशीनंतर वाढतो त्रास : मधुमेह दिनानिमित्त जनजागृती फेरी

googlenewsNext

ठाणे : ठाणे जिल्ह्यामध्ये आजघडीला मधुमेहाचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक असल्याची बाब जागतिक मधुमेह दिनानिमित्त पुढे आली आहे. हा आजार साधारत: ३० ते ८० वयोगटातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत असून लहान बालकांमध्ये हे प्रमाण केवळ दोन टक्के असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच हे प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामीण भागांसह शहरी भागातील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आजच्या युगात पुरु षांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात महिला दिसत आहेत. त्यातच या स्पर्धात्मक युगात त्यांना घरची जबाबदारी सांभाळून अशी दुहेरी कसरत करावी लागत असल्याने त्यांचे जिवन अधिक वेगवान होत चालले आहे. त्यामुळे त्यांना जडणाºया आजारांची जाणीव होत नसते. त्यातच मधुमेह सारखा आजार जडल्यास त्यावर वेळीच उपचार न झाल्यास त्यामुळे होणाºया अनेक आजारांनी त्या महिलेला जखडले जात आहे.
ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयातदेखील विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येणाºया रु ग्णांची तपासणी केली जाते. पूर्वी वयाची ५० वर्षे ओलांडलेल्या रु ग्णांमध्ये मधुमेहाचे प्रमाण हे अधिक प्रमाणात आढळत होते. मात्र, सध्याच्या घडीला वयाची ३० वर्षे ओलांडलेल्या रु ग्णामंध्ये ते अधिक आढळुन येत असल्याचे रु ग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते. विशेष म्हणजे मधुमेह या आजाराचे प्रमाण हे पूर्वी पुरु षांमध्ये अधिक होते. मात्र,आता ते महिलांमध्ये सर्वाधिक आढळून येत असल्याचे दिसत आहे. यामुळेच महिलांमधील मधुमेहाचे हे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहारी भागात आंगणवाडी सेविकांच्या मदतीने या आजारासंदर्भात मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार असल्याची डॉ.एन.बी.मुळीक यांनी दिली.
दरम्यान, मंगळवारी जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रु ग्णालयाने जनजागृतीची प्रभातफेरी काढली.यावेळी या जिल्हा सामान्य रु ग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता माकोडे आदी उपस्थित होते.

Web Title:  Diabetes mellitus in women more than men; Increases in tension after birth: Public awareness celebrations during Diabetes Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.