ठाणे पोलिसांची डायल ११२ यंत्रणा लय भारी, तत्परतेत राज्यात प्रथम
By अजित मांडके | Published: November 1, 2022 06:04 PM2022-11-01T18:04:05+5:302022-11-01T18:05:30+5:30
या प्रकल्पाअंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात ४५ चारचाकी व ६० दुचाकी वाहने एमआयटी, जीपीएस यंत्नणोसह सुसज्ज करण्यात आली आहेत.
ठाणे : अपघात झाल्यानंतर किंवा संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे पोलीसांची यंत्रणा डायल-११२ ही यंत्रणा राज्यात अव्वल असल्याची माहिती पुढे आली आहे. ऑक्टोंबर २०२२ मध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हे नागरिकांना पोलीस प्रतिसाद ( मदत ) पोहचिवण्यात संपुर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आले असल्याची माहिती ठाणे शहर पोलीसांच्या वतीने देण्यात आली.
या प्रकल्पाअंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात ४५ चारचाकी व ६० दुचाकी वाहने एमआयटी, जीपीएस यंत्नणोसह सुसज्ज करण्यात आली आहेत. नियंत्नण कक्षामध्ये डिस्पॅचर यंत्नणा स्वतंत्नपणो उभारण्यात आली आहे. त्याकरीता प्रशिक्षित पोलीस अधिकारी व अंमलदार, तसेच तांत्रिक सहाय्याकरीता तंत्नज्ञांची नेमणुक करण्यात आलेली आहे. सर्वसामान्य नागरीकांनी पोलीस मदतीकरीता डायल ११२ वर केलेल्या कॉलला नव्या व आधुनिक सुविधेमुळे अतिशय कमी वेळात पोलीस मदत मिळण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यानुसार ऑक्टोंबर २०२२ मध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालय संपुर्ण महाराष्ट्र राज्यात नागरीकांना पोलीस प्रतिसाद ( मदत ) पोहचिवण्यात प्रथम क्रमांकावर आलेले असुन, नागरीकांना पोलीस मदत पोहचिवण्याचा सरासरी वेळ ४ मिनिटे २० सेकंद असा आला आहे.
ठाणे शहर पोलीस नियंत्नण कक्षास, नागरीकांकडून दररोज सरासरी २५० ते ३०० तर महिनाभरात एकुण ८१७५ तक्र ारींचे कॉल प्राप्त झाले आहेत. त्याकरीता पोलीस आयुक्त ठाणो शहर यांनी कमीत कमी वेळात नागरीकांना पोलीसांचा दर्जेदार प्रतिसाद मिळेल यादृष्टीने मार्गदर्शन केले. यामध्ये सर्व बिट मार्शल व पीसीआर वाहनांवरील स्टाफ यांना समुपदेशन करून नागरीकांच्या प्रति संवेदनशिलता वाढविणो करीता आवश्यक ते प्रशिक्षण दिले गेले आहे. वरिष्ठ अधिकारी यांचेकडून नियंत्नण कक्षामार्फत रोजच्या रोज या बाबत आढावा घेऊन प्रतिसाद वेळ जास्त देणा:या संबंधित पोलीस अधिकारी व अमलदारांना आवश्यक ते व्यक्तीगत मार्गदर्शन केले जाते. याबाबत रोजच्या रोज आयुक्तायातील सर्व पोलीस ठाणोंचे सर्व वरीष्ठ पोलीस निरीक्षक तसेच संबंधित पोलीस उप आयुक्त यांना देखिल प्रतिसाद वेळ कमी करणो बाबत कळविण्यात येत आहे.
डायल ११२ या प्रकल्पात येणाऱ्या तांत्रिक समस्या सोडविण्यास पोलीस आयुक्तालय, ठाणो शहर यांना काही प्रमाणात यश प्राप्त झालेले आहे. वरील सर्व बाबींमुळे ठाणो शहर पोलीस आयुक्तालय संपुर्ण महाराष्ट्र राज्यात नागरीकांना पोलीस मदत / प्रतिसाद पोहचिवण्यात प्रथम क्र मांकावर आलेले आहे. तसेच यापुढेही ठाणो शहर पोलीस आयुक्तालय नागरीकांना तात्काळ पोलीस मदत पोहचिवण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास ठाणो पोलिसांनी व्यक्त केला आहे.