जीन्स पॅन्ट घेतल्या पैसेच दिले नाही! उल्हासनगरात व्यापाऱ्यांची २६ लाखाची फसवणूक
By सदानंद नाईक | Updated: September 28, 2022 17:55 IST2022-09-28T17:53:35+5:302022-09-28T17:55:09+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात जीन्स पॅन्टचे प्रसिद्ध मार्केट आहे. हजारो जीन्स पॅन्टची दुकाने आहेत. भाटिया चौकात सतिष हरजांनी यांची जीन्स रेडिमेड गारमेंट नावाचे दुकान आहे.

जीन्स पॅन्ट घेतल्या पैसेच दिले नाही! उल्हासनगरात व्यापाऱ्यांची २६ लाखाची फसवणूक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ भाटिया चौकात जीन्स रेडिमेड गारमेंटचा सतीश हरजांनी यांचा व्यवसाय असून त्यांनी सन २०१९ मध्ये ८ जणांना २५ लाख ९४ हजार ५८६ रुपयांच्या जीन्स पॅन्ट उधारीवर दिल्या होत्या. मात्र त्यांनी जीन्स पॅन्टचे पैसे न देता फसवणूक केली. याप्रकरणी मंगळवारी हिललाईन पोलीस ठाण्यात ८ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात जीन्स पॅन्टचे प्रसिद्ध मार्केट आहे. हजारो जीन्स पॅन्टची दुकाने आहेत. भाटिया चौकात सतिष हरजांनी यांची जीन्स रेडिमेड गारमेंट नावाचे दुकान आहे. हरजांनी यांच्या ओळखीचे रामचंद्र कुकरेजा यांनी दिलीप जैन, त्रिशला, जितेंद्र चोपडा, अरविद रावल, कांतीलाल चौधरी, राणा राम व गिरीश रावल यांची ओळख करून दिली.
दरम्यान कुकरेजा यांच्या ओळखीने सतिष हरजांनी यांनी २५ जून ते १९ सप्टेंबर २०१९ दरम्यान २५ लाख ९४ हजार ५८६ रुपयांचा जीन्स पॅन्ट टप्याटप्याने उधारीने दिला. मात्र आठही जणांनी जीन्स पॅन्टचे पैसे न दिल्याने, आपली फसवणूक झाल्याचे हरजांनी यांच्या लक्षात आले. हरजांनी यांनी मंगळवारी हिललाईन पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना कथन केला.
हिललाईन पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ८ जणा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस आठही जणांचा शोध घेत आहेत.