तुम्ही मतदार कार्डाशी आधार जोडले का?; ऑनलाइन अर्जासाठी काय कराल, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 05:54 PM2022-07-19T17:54:11+5:302022-07-19T17:54:21+5:30

राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार कार्डाशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम १ ऑगस्टपासून जिल्ह्यात सुरू हाेणार आहे.  

Did you link Aadhaar with voter card?; Know what to do for online application | तुम्ही मतदार कार्डाशी आधार जोडले का?; ऑनलाइन अर्जासाठी काय कराल, जाणून घ्या

तुम्ही मतदार कार्डाशी आधार जोडले का?; ऑनलाइन अर्जासाठी काय कराल, जाणून घ्या

Next

- सुरेश लाेखंडे 

ठाणे : जिल्ह्यात सहा महापालिका, दोन नगर परिषदा आणि तब्बल १८ विधानसभा आहेत. महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचे पडघम लवकरच वाजणार आहेत. यासाठी आवश्यक मतदार नाेंदणीसह मतदार याद्या तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार कार्डाशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम १ ऑगस्टपासून जिल्ह्यात सुरू हाेणार आहे.  

ऑनलाइन अर्जासाठी काय कराल?

  • मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक मतदार त्याचा आधार क्रमांक अर्ज क्र. ६ ब मध्ये भरून देऊ शकतो. 
  • या अर्जाच्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध केल्या जातील. 
  • याशिवाय हा अर्ज क्र. ६ ब हा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होईल.

अर्ज क्रमांक ६ द्वारे भरा महिती-

नमुना अर्ज क्र. ६, ७ व ८ मध्ये १ ऑगस्टपासून सुधारणा करण्यात येत आहेत. नमुना ६ ब नव्याने तयार केला आहे. सुधारित अर्जानुसारच मतदारांनी मतदार यादीतील बदल अथवा नोंदणीची प्रक्रिया करावी.

Web Title: Did you link Aadhaar with voter card?; Know what to do for online application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.