गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टँकरमधून इंधन गळती; डिझेल पळवण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 08:06 PM2024-10-19T20:06:33+5:302024-10-19T20:07:18+5:30

गळतीमुळे रस्त्यावर सांडणारे डिझल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.

Diesel spillage from a tanker heading towards gujarat | गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टँकरमधून इंधन गळती; डिझेल पळवण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी

गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टँकरमधून इंधन गळती; डिझेल पळवण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी

हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क 
पालघर : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाडा खडकोना गावाच्या हद्दीत सागर हॉटेल समोर शनिवारी दुपारी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टँकर मधून डिझेलची गळती सुरु झाली होती. टँकर मधून  गळतीमुळे रस्त्यावर सांडणारे डिझल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. बादल्या, डबे आणि मिळेल त्या साधनातून सांडणारे डिझल साठवण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडाली होती.हे पाहता १९९३ वर्षापूर्वी अश्याच एका घटनेत मेंढवन खिंडीत आगीचा भडका उडून ११३ लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याने त्याच घटनेची पुनरावृत्ती होते की काय?अशी भीती व्यक्त केली जात होती.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील डिझेल वाहतूक टँकरला गळती लागल्यानंतर 28 हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या एका कप्प्यातून डिझलची गळती सुरु झाली होती.सहा हजार लिटर डिझलची गळती झाल्याची माहिती समोर आली आहे.टँकर मधून  गळतीमुळे सांडणारे डिझल भरण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.बदल्या,डबे आणि मिळेल त्या साधनातून सांडणारे डिझल साठवण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडाली होती.ग्रामस्थांकडून टँकर मधून सांडणाऱ्या ज्वालाग्राही  डिझलची साठवणूक असुरक्षित पद्धतीने केली जात असल्यामुळे आग लागून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. १९९३ वर्षापूर्वी याच मुंबई अहमदाबाद मार्गावर मेंढवन खिंडीत एक टँकर उलटल्या नंतर त्यातून रस्त्यावर पडलेल्या ज्वालाग्रही रसायनाला पेट्रोल डिझेल समजून परिसरात राहणाऱ्या लोकांनी आपल्या घरातील भांडी गोळा करून घरात साठा जमवून ठेवला होता ह्यावेळी एका छोट्याश्या आगीने मेंढवण आणि परिसरातील अनेक पाडे आगीत भस्मसात होऊन सुमारे ११३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.त्यामुळे आजच्या घटनेमुळे ह्या घटनेची पुनरावृत्ती होते की काय?अशी स्थिती निर्माण झाली होती.
 

Web Title: Diesel spillage from a tanker heading towards gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर