दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन सुरु : ग्रंथांचा ठेवा आॅनलाइनदेखील देण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:58 AM2017-11-14T01:58:37+5:302017-11-14T01:58:42+5:30

येथील मराठी ग्रंथसंग्रहालयातील १८ लाख पानांचे संपूर्ण डिजिटायझेशन होणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे ३ लाख पानांचे डिजिटायझेशन करण्यात येईल.

 Digitization of rare books started: Instructions for giving texts online online | दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन सुरु : ग्रंथांचा ठेवा आॅनलाइनदेखील देण्याची सूचना

दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन सुरु : ग्रंथांचा ठेवा आॅनलाइनदेखील देण्याची सूचना

Next

ठाणे : येथील मराठी ग्रंथसंग्रहालयातील १८ लाख पानांचे संपूर्ण डिजिटायझेशन होणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे ३ लाख पानांचे डिजिटायझेशन करण्यात येईल. दररोज सुमारे १० हजार पाने स्कॅन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या आधी १७७७ दुर्मीळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सोमवारी सुरु वात झाली. ग्रंथसंग्रहालयातील उर्वरित सर्व ग्रंथांचे डिजिटायझेशन करणे तसेच या पुस्तकांची दर्जेदार वेबसाइट आदींसाठीदेखील जिल्हा प्रशासनातर्फे आर्थिक साहाय्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण उपक्र मातून हा आगळावेगळा उपक्र म जिल्हाधिकाºयांनी हाती घेतला असून त्यांनी पदभार घेताच ग्रंथसंग्रहालयाची ही मागणी मान्य करून ५० लाखांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी यापूर्वी अशा प्रकारे डिजिटायझेशन करण्यास अनुकूलता दर्शवली होती. जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना निधी हस्तांतरित करून त्यांच्यामार्फत हा प्रकल्प राबवण्यात येत असून येत्या मार्चपर्यंत तो पूर्ण होणे अपेक्षित आहे. ग्रंथालयात सध्या १७७७ दुर्मीळ पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकांची एकूण पृष्ठसंख्या २,९०,७१० आहे. यासह इतर सर्व पुस्तकांची १८ लाख पाने असून यामध्ये ३४४ काव्याशी संबंधित, २२८ नाटकाची, १९४ इतिहासाची, १७८ निबंधाची, १४९ चरित्र, १४३ कादंबºया, ७७ संकीर्ण, अध्यात्माची ५१, धर्मावर आधारित ५२ तर वैद्यक ५१ तसेच गणितशास्त्राची ४४, पौराणिक ४१, १६ शब्दकोश आदी प्रकारांची पुस्तके असून त्यांचे डिजिटायझेशन होणार आहे. नुकतीच या कामाला सुरु वात झाल्याने सध्या वेग कमी असला, तरी तो भविष्यात वाढेल, असा विश्वास हे काम करणारे राहुल गुंजाळ आणि श्रीनिवास कोंगे यांनी सांगितले.
अशी चालते प्रक्रिया-
दोन्ही पाने एकावेळी स्कॅन होतील, अशा पद्धतीने पुस्तक ठेवतात. स्कॅन पानांचा दर्जा तपासून आवश्यक त्या दुरु स्त्या करून प्रकरणाचे इंडेक्सिंग केले जाते.
अंतिम मसुदा पीडीएफ व जेपीजीमध्ये रूपांतरित करून सर्व्हरवर सेव्ह केला जातो.

Web Title:  Digitization of rare books started: Instructions for giving texts online online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.