ठाणे आणि भिवंडी जोडणाऱ्या नाशिक दिशेने जाणारा पुलाची दुरावस्था; एक भाग हलू लागला
By अजित मांडके | Published: August 23, 2023 01:00 PM2023-08-23T13:00:21+5:302023-08-23T13:02:15+5:30
मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणारा साकेत पुलाचा खाडीवरील एक भाग जवळजवळ पूर्णपणे हलू लागला आहे.
ठाणे : मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणारा साकेत पुलाचा खाडीवरील एक भाग जवळजवळ पूर्णपणे हलू लागला आहे, त्यामुळे येथील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. बुधवारी याची माहिती मनसेचे शहर प्रमुख रवी मोरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याठिकाणी धाव घेत आंदोलन केले.
खाडी वरील बरोबर मधला भाग हा एक दिशेने खाली झुकल्याच दिसत आहे. त्यात याच मार्गावरून जाणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले जात असताना त्यांची गाडी मनसे ने अडवली व त्यांना या पुलाची अवस्था दाखवून दिली. 32 वर्षे जुना हा पूल असून मंगळवार पासून तो हलू लागल्याचे दिसत आहे.त्यामुळे पुलावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि संबंधित अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पुलाची पाहणी केली.
ठाणे आणि भिवंडी या ठिकाणी जोडला जाणाऱ्या नाशिक दिशेने जाणारा पुलाचा भाग हलत असल्याचे समोर आले. या ठिकाणी पुलाचा भागही तुटल्याचे समोर आले. जड वाहन जात असल्यामुळे पुलाचा भाग हलत आहे. (व्हिडीओ -विशाल हळदे) pic.twitter.com/PkFvcPUPsb
— Lokmat (@lokmat) August 23, 2023