कल्याणमध्ये निघाली मायमराठी दिंडी
By admin | Published: January 14, 2017 06:28 AM2017-01-14T06:28:38+5:302017-01-14T06:28:38+5:30
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’, ‘जे काही रंजिले गांजिले’, ‘असाध्य ते साध्यकरिता साहाय्यास’, असे फलक घेतलेल्या
कल्याण : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’, ‘जे काही रंजिले गांजिले’, ‘असाध्य ते साध्यकरिता साहाय्यास’, असे फलक घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे आणि वाचनाचे महत्त्व इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
निमित्त होते येथील शेठ हिराचंद्र मुथा महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी शुक्रवारी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीला फडके मैदान येथून प्रारंभ झाला. त्यानंतर लाल चौकी, पारनाका मार्ग, टिळक चौक, अहिल्याबाई चौक, शंकरराव चौक या मार्गे दिंडी फिरून सुभाष मैदानात तिचा समारोप झाला.
वाजतगाजत ढोलताशांच्या गजरात दिंडीचे सुभाष मैदानात स्वागत करण्यात आले. त्यानंतर, एक तास या मैदानात ढोलताशांचा नाद घुमत होता. महाविद्यालयातील ७० मुलेमुली पारंपरिक वेशभूषेत दिंडीत सहभागी झाली. (प्रतिनिधी)