मंदिराच्या दानपेटीतील रोकड चोरणाऱ्या दुकलीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 08:01 PM2021-02-08T20:01:30+5:302021-02-08T20:25:55+5:30
पिंपरीगाव येथील केदारेश्वर मंदिराच्या दानपेटीतील रोकड चोरणाºया शरिफ शेख (२५) आणि मोहमंद मुल्ला (२८) या दोघांना डायघर पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी सोमवारी दिली. यातील शरीफ याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे तर मुल्ला याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पिंपरीगाव येथील केदारेश्वर मंदिराच्या दानपेटीतील रोकड चोरणाºया शरिफ शेख (२५) आणि मोहमंद मुल्ला (२८) या दोघांना डायघर पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून ४६ हजार ६७० रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.
ठाणे तालुक्यातील पिंपरी गाव येथील केदारेश्वर मंदिरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटीतील ४० हजार ते ४५ हजार रुपये अज्ञात चोरटयांनी ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान चोरी केली होती. याची तक्रार डायघर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या माार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे आणि भूषण कापडणीस जमादार नाना मोरे, पोलीस नाईक दीपक जाधव, धनंजय आहेर, रतीलाल वसावे, मुकूंद आव्हाड, अंमलदार गणेश सपकाळे आणि महेंद्र बरफ आदींचे पथक गस्त घालीत असतांना केदारेश्वर मंदिर ते तळोजा, खारघर परिसरातील ३० सीसीटीव्हींची त्यांनी तपासणी केली. याच तपासणीमध्ये शरीफ आणि मोहम्मद मुल्ला या दोघांची नावे समोर आली. त्यांना ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान ताब्यात घेतले. सखोल चोकशीत त्यांनी या चोरीची कबूली दिली. त्यांच्याकडून दानपेटीतील चोरलेली ४६ हजार ६७० रुपयांची रोकड, घरफोडीसाठीची हत्यारे आणि रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला. यातील शरीफ याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे तर मुल्ला याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.