अल्पवयीन मुलीला सेक्स रॅकेटमध्ये अडकविणाऱ्या माय लेकींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 03:58 PM2021-04-06T15:58:29+5:302021-04-06T16:00:47+5:30

अल्पवयीन मुलींना सेक्स रॅकेटमध्ये अडकवून त्यांच्याकडून शरीर विक्र याचा व्यवसाय करून घेणाºया एका ४१ वर्षीय महिलेला तिच्या १७ वर्षीय मुलीसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्यांच्या तावडीतून दोन अल्पवयीन मुलींची सुटकाही करण्यात आली आहे.

Dio ladies arrested for luring a minor girl into a sex racket | अल्पवयीन मुलीला सेक्स रॅकेटमध्ये अडकविणाऱ्या माय लेकींना अटक

वागळे इस्टेट येथील एका हॉटेलवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाईवागळे इस्टेट येथील एका हॉटेलवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अल्पवयीन मुलींना सेक्स रॅकेटमध्ये अडकवून त्यांच्याकडून शरीर विक्र याचा व्यवसाय करून घेणाºया एका ४१ वर्षीय महिलेला तिच्या १७ वर्षीय मुलीसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्यांच्या तावडीतून दोन अल्पवयीन मुलींची सुटकाही करण्यात आली आहे. एक लाख रु पपांच्या बदल्यामध्ये त्यांना या अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आले होते.
दोन अल्पवयीन मुलींना शरीर विक्र याचा व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याकडून ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या पथकाने सोमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट रोड क्रमांक १५ येथील जुन्या पासपोर्ट कार्यालयासमोरील हॉटेल साऊथ कोस्ट याठिकाणी सापळा लावला. याठिकाणी एक लाखांमध्ये दोन १७ वर्षांच्या कुमारी मुलींचा एका दलाल महिलेने तक्रारकर्त्या सामाजिक कार्यकर्त्याशी सौदी केला. हा सौदा पक्का झाल्यानंतर कडलग यांच्या पथकाने यातील दलाल महिलेसह तिच्या मुलीलाही ताब्यात घेतले. त्याचवेळी त्यांच्या तावडीतून १६ आणि १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचीही सुटका करण्यात आली. याप्रकरणी आता श्रीनरगर पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Dio ladies arrested for luring a minor girl into a sex racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.