ठाणे जिल्हा परिषदेच्या सरळ भरतीत निवड झालेल्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्त आदेश
By सुरेश लोखंडे | Published: March 16, 2024 02:52 PM2024-03-16T14:52:20+5:302024-03-16T14:52:44+5:30
वरिष्ठ सहाय्यक लिपिक, लघुलेखक निम्नश्रेणी, विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी-२ वर्ग -३ या पदाचे अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन उमेदवार यादी जिल्हा परिषद ठाणे च्या अधिकृत संकेतस्थळावर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ठाणे : सरळ सेवा भरती -२०२३ अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आज, ठाऊजिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. वेळी त्यांनी उपस्थित सहा उमेदवारांचे अभिनंदन केले.
वरिष्ठ सहाय्यक लिपिक, लघुलेखक निम्नश्रेणी, विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी-२ वर्ग -३ या पदाचे अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन उमेदवार यादी जिल्हा परिषद ठाणे च्या अधिकृत संकेतस्थळावर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट - क सरळ सेवा भरती करण्यासाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी विविध संवर्गातील २५५ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयबीपीएस या संस्थेद्वारे सदर परिक्षा घेण्यात आली असून काही संवर्गाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इतर उर्वरित संवर्गातील निकालामध्ये पात्र उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी सुरू असून लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.