सरळगाव नाक्यावर होतेय गुरांमुळे वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 10:40 PM2019-09-21T22:40:05+5:302019-09-21T22:40:21+5:30

वाहनचालक त्रस्त; वाहतूक पोलिसाची गरज

Direct traffic was on the nose due to cattle traffic | सरळगाव नाक्यावर होतेय गुरांमुळे वाहतूककोंडी

सरळगाव नाक्यावर होतेय गुरांमुळे वाहतूककोंडी

Next

मुरबाड : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर सरळगाव येथील नाक्यावर वाहतूक पोलिसाची गरज आहे. मात्र, याठिकाणी पोलिसांची नियुक्ती झालेली नसली तरी मोकाट गुरे वाहतूक नियंत्रणाचे काम करत असल्याचे दिसत आहे. भररस्त्यात ही गुरे ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांना जोखमीचे ठरत आहे. कधीकधी तर गाडीतून उतरून या गुरांना पळवावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मुरबाड-कल्याण-माळशेज या राष्ट्रीय महामार्गावर सरळगाव येथील नाक्यावरून शहापूर, नाशिक, कल्याण, आळेफाटा, नगर या दिशेने वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच मुरबाड-शहापूर हा मार्ग तीन वर्षांपासून बंद असल्याने खोपोली आणि मुरबाड, पनवेल या ठिकाणच्या एमआयडीसीतील अवजड वाहने सरळगाव मार्गेच जात असल्याने सरळगाव येथे सतत ट्रॅफिक जॅमची समस्या असते. त्यातच या मार्गावर मोकाट जनावरांचा कळप ठाण मांडत असल्याने ही परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे. या जनावरांमुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने या नाक्यावर वाहतूक पोलिसांची गरज आहे.

महामार्गावरील सरळगाव येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठी बाजारपेठ आहे. दरमंगळवारी आठवडाबाजाराचा दिवस असल्याने भाजीपाला घेऊन आलेल्या वाहनांची वर्दळ असते. तसेच, राष्ट्रीय महामार्ग असल्याने माळशेज, आळेफाटा, कल्याणसह येणाऱ्या व जाणाºया वाहनांची वाहतूक सातत्याने सुरू असते. त्यामुळे मोकाट जनावरे दिवसभरासह रात्री येथील रस्त्यावर वावर असतो. त्यामुळे अनेक वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, एकेरी वाहतूक करावी लागत आहे. रात्री रस्त्यावर बसलेली जनावरे पटकन दिसत नसल्याने मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे सरळगाव ग्रामपंचायतीने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांसह नागरिक तसेच वाहनचालक करत आहेत.

‘गुरांचा बंदोबस्त करू’
सरळगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विलास जाधव यांच्याशी संपर्कसाधला असता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरच यावर निर्णय घेऊन मोकाट जनावरांबाबत नोटीस काढून मालकांना तशा सूचना देऊ न बंदोबस्त करू, असे सांगितले.

Web Title: Direct traffic was on the nose due to cattle traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.