उद्यान-दुभाजकांत शोभिवंत झाडे लावण्यासह सार्वजनिक अस्वच्छता पसरावणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश 

By धीरज परब | Published: April 19, 2023 12:52 PM2023-04-19T12:52:21+5:302023-04-19T12:54:26+5:30

सालासर उद्यानातील कारंजे तातडीने चालू करणे, वाढता उन्हाळा पाहता झाडांना नियमित पाणी देणे, मातीची गुणवत्ता सुधारणे,  दुभाजकांची रंगरंगोटीचे करण्यास सांगितले. 

Directions for taking action against those who spread public filth including planting ornamental trees in bifurcations | उद्यान-दुभाजकांत शोभिवंत झाडे लावण्यासह सार्वजनिक अस्वच्छता पसरावणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश 

उद्यान-दुभाजकांत शोभिवंत झाडे लावण्यासह सार्वजनिक अस्वच्छता पसरावणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश 

googlenewsNext

मीरारोड - काशीमिरा उड्डाणपुलाखाली उद्यान, सालासार उद्यानाची पाहणी करून उद्याने व दुभाजकां मध्ये विविध जातीच्या फुलझाडांची व शोभिवंत झाडांची लागवड करण्यास आयुक्त दिलीप ढोले यांनी वॉक विथ कमिश्नर अभियान दरम्यान पाहणी वेळी सांगितले.

आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड व कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबित तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत शहरातील विविध भागांची पाहणी केली .  भाईंदर पश्चिम उड्डाणपुलाखाली प्रगतीपथावर असलेले सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष व पशू वैद्यकीय दवाखानाची पाहणी केली. साफसफाई व रंगरंगोटी करण्यास सांगितले. 

सालासर उद्यानातील कारंजे तातडीने चालू करणे, वाढता उन्हाळा पाहता झाडांना नियमित पाणी देणे, मातीची गुणवत्ता सुधारणे,  दुभाजकांची रंगरंगोटीचे करण्यास सांगितले. रस्त्याच्या कडेला व फुटपाथवर पडलेले डेब्रिज - माती तसेच ठेवलेल्या कचरा कुंड्या व गटार सफाईचा गाळ तातडीने उचलण्याचे निर्देश दिले. गटारांची तुटलेली झाकणे नव्याने बसवा व रस्ता ते पदपथ दरम्यानच्या भागाचे डांबरीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी साफसफाई ठेवावी व फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या, खाद्यविक्रेते यांच्याकडून अस्वच्छता पसरत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास आयुक्त ढोले यांनी अधिकाऱ्यांना सांगितले .

Web Title: Directions for taking action against those who spread public filth including planting ornamental trees in bifurcations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.