उपायुक्तांसह ठाणे जिल्हयातील २९ पोलिसांना उत्कृष्ठ सेवेचे महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 09:00 PM2020-05-01T21:00:01+5:302020-05-01T21:09:40+5:30

कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या मुंब्रा येथील निरीक्षकासह ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १८ तसेच ठाणे ग्रामीणच्या ११ अशा २९ पोलिसांना उत्कृष्ठ सेवेचे पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह १ मे रोजी जाहीर झाले आहे. या सर्वांना येत्या काही दिवसांमध्ये ही सन्मानचिन्हे प्रदान केली जाणार आहेत.

Director General of police announced Outstanding Service Honors to 29 policemen in Thane district including Deputy Commissioners of Police | उपायुक्तांसह ठाणे जिल्हयातील २९ पोलिसांना उत्कृष्ठ सेवेचे महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

ठाणे ग्रामीणच्या उपअधीक्षकांसह ११ पोलिसांचा समावेश

Next
ठळक मुद्देगुन्हे अन्वेषण विभागाच्या नऊ जणांचा समावेशठाणे ग्रामीणच्या उपअधीक्षकांसह ११ पोलिसांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पोलीस सेवेतील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ठाणे शहर मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्यासह सलग १५ वर्षे सेवेत उत्तम कामगिरी बजावणा-या १८ तर ठाणे ग्रामीणच्या ११ पोलिसांना शुक्रवारी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहिर झाले आहे. यामध्ये कोरोनावर यशस्वी मात करणाºया मुंब्रा येथील निरीक्षकासह गुन्हे अन्वेषण विभागातील नऊ पोलिसांचा समावेश आहे. या सर्वांना येत्या काही दिवसांमध्ये ही सन्मानचिन्हे प्रदान केली जाणार आहेत.
दरवर्षी महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येत असते. महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर संबंधित जिल्हयाचे पालकमंत्री हे ही सन्मानचिन्हे प्रदान करीत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचा सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १८ जणांना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते तर ग्रामीणच्या ११ जणांना पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते ही सन्मानचिन्हे प्रदान केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस दलात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणा-या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय २ चे उपायुक्त प्रशांत मोहिते यांना २०१९ या वर्षासाठी हे सन्मानचिन्ह बहाल केले जाणार आहे. याशिवाय, सलग १५ वर्षे प्रशंसनीय उल्लेखनीय कामगिरी करणा-या ठाणे गुन्हे अन्वेषण विभागातील नऊ जणांची या पदाकासाठी निवड झाली आहे. यामध्ये ठाणे शहर युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, वागळे इस्टेट युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस आयुक्त कार्यालयातील वाचक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय घोसाळकर, पोलीस हवालदार एस. आर. जाधव, हवालदार गणेश भोसले (भिवंडी), संजय माळी (उल्हासनगर), अंकुष भोसले (खंडणी विरोधी पथक), रविंद्र पाटील (युनिट-१), आणि नितीन ओवळेकर (खंडणी विरोधी पथक) आदींचा समावेश आहे. याशिवाय, नुकतीच कोरोनावर मात करुन रुग्णालयातून परतलेले मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक चंद्रशेख यादव, जमादार दत्ताराम पालांडे (वाहतूक शाखा), पोलीस हवालदार प्रियंका काते (कोपरी), विना अपघात उत्तम वाहन चालविणारे हवालदार नुरु खान, पोलीस नाईक निसार पिंजारी (बाजारपेठ), नरेंद्र बागुल (मानपाडा) आणि क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य दाखविणाºया मुख्यालयातील पोलीस शिपाई अरुणा सावंत यांचाही यात समावेश आहे.
याशिवाय, ठाणे ग्रामीणमधील भार्इंदरचे उपअधीक्षक शशिकांत भोसले, मुरबाडचे उपअधीक्षक बसवराज शिवपुजे तसेच उपनिरीक्षक नवनाथ कवडे, जमादार गुरुनाथ गोसावी, पोलीस हवालदार सुनिल देटके, अनिल शिलवंत, मच्छिंद्र पंडित, दत्तात्रय गाढवे, सरीता धनावडे, शरयू हिंदूराव आणि कमलाकर चासकर आदी ११ जणांचाही यात समावेश आहे.

Web Title: Director General of police announced Outstanding Service Honors to 29 policemen in Thane district including Deputy Commissioners of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.