ठाणे २५ लोकसभा मतदार संघांतील १४८ ठाणे विधानसभा क्षेत्रातील मतदान व्यवस्थेत अव्यवस्था!

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 20, 2024 11:02 AM2024-05-20T11:02:16+5:302024-05-20T11:03:45+5:30

मतदारांच्या घामाच्या धारा व प्रचंड परवड!! लागलीच कार्यवाही करा!!!

Disarray in the voting system of 148 Thane Vidhan Sabha constituencies in Thane 25 Lok Sabha constituencies | ठाणे २५ लोकसभा मतदार संघांतील १४८ ठाणे विधानसभा क्षेत्रातील मतदान व्यवस्थेत अव्यवस्था!

ठाणे २५ लोकसभा मतदार संघांतील १४८ ठाणे विधानसभा क्षेत्रातील मतदान व्यवस्थेत अव्यवस्था!

ठाणे :  उपरोक्त मतदारसंघात ढोकाळी येथिल श्री. शरदचंद्र मिनी स्पोर्ट्स कॅाम्पलेक्समध्ये बॅडमिंटन हॅालमध्ये तात्पुरते तंबू उभारून मतदानाचे ४ बुथ्स बुथ क्र. ११७ ते १२० उभारले आहेत. येथे सकाळी ७ः१५ ते ८ः४५ अशी दीड तास रांग लावल्यावर मी मतदान करू शकलो. सर्व बुथ्सवर प्रचंड रांगा आहेत. बॅडमिंटन हॅालमध्ये ४ बुथ्सचे मिळून साधारणतः हजार एक स्त्री - पुरुष मतदार उभे होते, अशी माहिती  डॉ. संजय मंगला गोपाळ, भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र समन्वयक, यांनी दिली.

तापमान होतं ३३ डिग्री सेल्सियस व आद्रतेमुळे ३९ डिग्री सेल्सियस असल्याप्रमाणे जाणवत होतं. सर्व जण रांगेत उभे राहिल्यावर ५ च मिनिटात घामाने निथळत होते. नंबर लागे पर्यंत तासाभर लागत होता. त्या ठिकाणी ना पंखे ना पिण्याचं पाणी ना वरीष्ठ नागरिक व दिव्यांगांना बसण्याची सोय होती, असंही ते म्हणाले. मतदानाचा हक्क बजावायला आलेल्या नागरिकांची ही परवड थांबवा. सर्व मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांच्या सोयीसाठी पुरेसे पंखे, पिण्याचे पाणी व बसण्यासाठी खुर्च्या लागलीच पुरवा, अशी मागणी करत त्यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करण्याचं आवाहनही केलं.

Web Title: Disarray in the voting system of 148 Thane Vidhan Sabha constituencies in Thane 25 Lok Sabha constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.