आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!
By जितेंद्र कालेकर | Published: July 7, 2024 07:01 PM2024-07-07T19:01:25+5:302024-07-07T19:01:32+5:30
ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत.
ठाणे : एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास डगमगून न जाता धैर्याने सामोरे कसे जायचे? संकटग्रस्तांना मदतीचा हात कसा द्यायचा? त्यादृष्टीने ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या लुईसवाडी येथील कार्यालयात ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या पथकांनी आरटीओच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले.
यावेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाच्या खबरदारीबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. अशावेळी आपत्तीग्र्रस्तांना मदत पोहचविण्यात अडचणी येतात. काही कारणांमुळे उशिरही होतो.
अशावेळी जिवित आणि वित्तहानी मोठया प्रमाणात होण्याची भीती असते. त्यासोबतच वाढते रस्ते अपघात, हृदय विकार या घटना पाहता, लुईसवाडीतील प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी आणि अधिकाºयांनीही आपले सामाजिक कर्तव्य बजावण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.
महापूर, पाऊस वादळ वारा, भूस्खलन आदी आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वत:ची तसेच कुटुंबीयांची त्याचबरोबर इतरांची जिवितांची हानी होऊ नये, यासाठी कशाप्रकारे घरगुती उपाययोजना करता, येऊ शकतात, याची सविस्तर माहिती देण्यात आली. विविध रस्ते अपघातात प्रामुख्याने रक्तस्त्राव होऊन अपघाती मृत्य होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अपघातीत जखमींना तत्काळ प्रथमोपचार देऊन रक्तस्त्राव थांबवता येऊ शकतो.
याबाबत तसेच हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला सीपीआर योग्य पद्धतीने कसा देण्यात यावा याबाबतही टी.डी.आर.एफ. जवानांनी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमास ठाणे महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, एन डी आर एफचे निरीक्षक सुशांत कुमार आदींनी मार्गदर्शन केलं.
प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या जवानांनी आरटीओ कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.
- रोहन काटकर, उपप्रादेशिक परिवहरन अधिकारी, ठाणे.