सिंघम सरांच्या शिकवणीमुळेच लागली शिस्त, आमच्या जीवनाला आयाम देण्याचे केले महत्त्वाचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 02:07 AM2020-09-05T02:07:49+5:302020-09-05T02:08:04+5:30

सर्वच शिक्षकांनी खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार दिला. कधी कौतुक केले तर कधी ओरडले. कधी शिस्त लावली, तर कधी चुका सुधारण्याची संधी दिली. अशा सर्वांचेच शिक्षकदिनी स्मरण होते.

Discipline was due to the teachings of Singham Sir, the important work done to give dimension to our lives | सिंघम सरांच्या शिकवणीमुळेच लागली शिस्त, आमच्या जीवनाला आयाम देण्याचे केले महत्त्वाचे काम

सिंघम सरांच्या शिकवणीमुळेच लागली शिस्त, आमच्या जीवनाला आयाम देण्याचे केले महत्त्वाचे काम

Next

- अजित मांडके
ठाणे : आमच्या विद्यानिकेतन (नाशिक) शाळेत सिंघम सर होते. विद्यार्थ्यांवर प्रेम करायचे आणि वेळप्रसंगी बिघडलेल्या विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे कामही तितक्याच ताकदीने करायचे. त्यांच्यामुळेच मला चांगली शिस्त लागलेली आहे, असे मत व्यक्त केले आहे, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी.

सर्वच शिक्षकांनी खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार दिला. कधी कौतुक केले तर कधी ओरडले. कधी शिस्त लावली, तर कधी चुका सुधारण्याची संधी दिली. अशा सर्वांचेच शिक्षकदिनी स्मरण होते. - संजय केळकर

आमची शाळाच
होती शिस्तप्रिय
माझे सुरुवातीचे शिक्षण हे डहाणूसारख्या ग्रामीण भागात झाले. इयत्ता चौथीपर्यंत मी तेथे शिक्षण घेतले. त्यानंतर, इंटर्नशिपची परीक्षा देऊन मी नाशिक येथील शासकीय विद्यानिकेतन शाळेत प्रवेश घेतला. आता एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी असतात. परंतु, त्याकाळी १९६७ मध्ये एकच वर्ग असायचा, तोही ३० विद्यार्थ्यांचाच. ही शाळा शिस्तप्रिय होती.

तास इतर कोणाचाही असला तरी सिंघम सर ठेवायचे लक्ष

वर्गात कोणत्याही शिक्षकाचा तास असू दे, सिंघम सर त्या वर्गाच्या बाहेर उभे राहून प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष ठेवून असत. विद्यार्थ्याचे अभ्यासाकडे लक्ष आहे किंवा नाही, अभ्यास न करता इतर काही गोष्टी वर्गात केल्या जात आहेत का, या बाबीकडे त्यांचे लक्ष असायचे. तसेच विद्यार्थीदशेत काय महत्त्वाचे असते, यावरही ते लक्ष ठेवत.

काही वेळेस त्यांच्या ते लक्षात आले की, ते वर्गावर येऊन विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असत. त्यामुळे आम्हाला त्याचा निश्चितच फायदा होत होता. एकूणच आमच्या जीवनाला आयाम देण्याचे महत्त्वाचे काम हे सिंघम सरांनीच केले.

शिक्षकांचे संस्कार येतात कामी...
शाळेतील विद्यार्थी शिकून बाहेर गेल्यावर त्याला शाळेचे संस्कार आणि शिस्त ही कामी येत असते आणि त्याच आधारावर पुढे आयुष्यात मोठे कार्य करूशकतो, अशी सिंघम सरांसोबतच सर्वच शिक्षकांची धारणा होती. कधी त्या अतिशिस्तीचा कंटाळा यायचा. पण, त्यांच्या सहवासातून आम्ही शिकलो, घडलो, वाढलो आणि आज ती शिस्त संपूर्ण प्रवासकार्यात उपयोगी येते आहे.

तो खाऊ
गेला परत
महिन्यातून पहिल्या रविवारी पालकांना पाल्याला भेटू दिले जात होते. एकदा काही पालक शाळेत पाल्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या हातात खाऊ होता. त्यांना विचारले की, खाऊ तुम्ही सर्वांसाठी की, तुमच्या पाल्याकरिता आणला. आपल्या पाल्यासाठी आणल्याचे सांगितल्यावर सर्व पालकांना तो खाऊ परत घरी न्यावा लागला.

Web Title: Discipline was due to the teachings of Singham Sir, the important work done to give dimension to our lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.