‘मागासवर्गीय असल्यानेच भेदभाव’, भाजपा नगरसेविकेचा शिवसेना महापौरावर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:45 AM2018-03-27T00:45:04+5:302018-03-27T00:45:04+5:30

मागासवर्गीय नगरसेविका असल्याने शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर भेदभाव करून पाण्याची समस्या सोडवत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप भाजप नगरसेविका खंडागळे यांनी केला आहे.

'Discrimination against backward class', BJP corporator's charge against Shiv Sena | ‘मागासवर्गीय असल्यानेच भेदभाव’, भाजपा नगरसेविकेचा शिवसेना महापौरावर आरोप

‘मागासवर्गीय असल्यानेच भेदभाव’, भाजपा नगरसेविकेचा शिवसेना महापौरावर आरोप

googlenewsNext

कल्याण : मागासवर्गीय नगरसेविका असल्याने शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर भेदभाव करून पाण्याची समस्या सोडवत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप भाजप नगरसेविका खंडागळे यांनी केला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे यांच्या प्रभागात गेल्या अडीच वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या आहे. संतप्त महिलांनी सोमवारी दुपारी १२ वाजता महापालिका मुख्यालयात धाव घेतली. स्थायी समितीकडून महासभेत अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने सुरक्षारक्षकांनी संतप्त महिलांना आत सोडले नाही. या महिलांच्या शिष्टमंडळास घेऊन खंडागळे यांनी प्रशासनाची भेट घेतली असता १५ दिवसांत पिसवली गोळवलीतील पाणीसमस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. वारंवार पाठपुरावा करूनदेखील प्रशासन दाद देत नाही.
२०१५ मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पिसवली-गोळवली प्रभाग क्रमांक ८६ मधून भाजपातर्फे खंडागळे या निवडून आल्या. पिसवली-गोळवली हा परिसर २७ गावांत होता. ही गावे महापालिकेत आली, तर त्यागावची पाणीपुरवठ्याची व्यवस्था एमआयडीसीकडे आहे. त्याचे बिल महापालिका भरते. महापालिका महिन्याला एक कोटीप्रमाणे वर्षाकाठी १२ कोटींचे बिल भरते. एमआयडीसीकडून पुरेसा पाणीपुरवठाच केला जात नाही. त्यामुळे पिसवली-गोळवली परिसराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. निवडून आल्यापासून सातत्याने पाणीपुरवठ्यासाठी खंडागळे या पाठपुरावा करतात. एकदा मोर्चा काढला होता. त्याचबरोबर महापालिकेत धाव घेतली होती. आता तीव्र उन्हाळा सुरू झाला. त्यात आठवड्यात शुक्रवारी औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बंद असतो. याशिवाय, सात टक्के पाणीकपात लागू झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आठवड्यातील पाच दिवस पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. हा पाणीपुरवठा दोन दिवसही होत नाही.

पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी रविवार, २५ मार्च रोजी रात्री १२ वाजता नगरसेविका खंडागळे यांच्या घरावर धाव घेतली. या वेळी संतप्त नागरिकांनी खंडागळे यांच्या घराचे प्रवेशद्वारच तोडून आत प्रवेश केला. नागरिकांनी त्यांचा रोष व्यक्त केला. या सगळ्यांना शांत करून नागरिकांनी पाण्यासाठी महापालिका मुख्यालयात यावे, असे आवाहन खंडागळे यांनी रविवारी रात्री केले.अडीच वर्षे पाठपुरावा करून ही समस्या सुटत नसल्याने खंडागळे यांनी महापौर देवळेकर यांच्यावर निशाणा साधला. मागासवर्गीय असल्याने जाणीवपूर्वक पाण्याचा प्रश्न लटकवून ठेवल्याचे खंडागळे यांचे म्हणणे आहे. भाजपाचे उपमहापौर मोरेश्वर भोईर आणि गटनेते वरुण पाटील यांनीही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्याही प्रयत्नांना यश आले नाही.

Web Title: 'Discrimination against backward class', BJP corporator's charge against Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.