उल्हासनगर महापालिका स्वच्छता अभियानाची चर्चा; खेळणी जमा करून गरीब मुलांना देणार

By सदानंद नाईक | Published: September 16, 2022 03:35 PM2022-09-16T15:35:19+5:302022-09-16T15:35:57+5:30

उल्हासनगर महापालिका स्वच्छता अभियान चर्चेचा विषय झाला असून नागरिकाकडून अभियानाचे कौतुक होत आहे. स्वच्छता अभियाना अंतर्गत गरीब व गरजू मुलांना यातून मदत होणार आहे.

Discussion of Ulhasnagar Municipal Cleanliness Campaign; Toys will be collected and given to poor children | उल्हासनगर महापालिका स्वच्छता अभियानाची चर्चा; खेळणी जमा करून गरीब मुलांना देणार

उल्हासनगर महापालिका स्वच्छता अभियानाची चर्चा; खेळणी जमा करून गरीब मुलांना देणार

Next

उल्हासनगर : महापालिकेने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता अमृत महोत्सव अंतर्गत लोकसहभागातून विविध योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये मुलांची जुनी खेळणी व सायकली दान करण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना करून त्यातील चांगली खेळणी व सायकली गरीब व गरजू मुलांना देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिका स्वच्छता अभियान चर्चेचा विषय झाला असून नागरिकाकडून अभियानाचे कौतुक होत आहे. स्वच्छता अभियाना अंतर्गत गरीब व गरजू मुलांना यातून मदत होणार आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या संकल्पनेतून अनेकांच्या घरात अडगळीत पडलेल्या जुन्या वस्तू दान करण्याचे आवाहन महापालिकेने केले. मुलांची खेळणी व सायकली यांची दुरुस्ती करून चांगल्या अवस्थेतील वस्तू गरीब व गरजू मुलांना देण्यात येणार आहे. तसेच जुने पुस्तके, ग्रंथ, स्पर्धात्मक परीक्षेचे पुस्तके एकत्र करून चांगले लोकउपयोगी पुस्तके मुलांसाठी महापालिकेच्या एका शाळेत ग्रंथालय उभे करण्यात येणार आहे.

महापालिकेने घराघरात अडगळीत पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जी निरुपयोगी आहेत. अश्या टीव्ही, रेडिओ, इस्त्री, हेडफोन, मोबाइल, चार्जर, मिक्सर, प्रिंटर, मोटर, पंप अथवा वायर या सगळ्या वस्तू एकत्र करण्यात येणार आहे. हा ई-कचऱ्याची विल्हेवाट महापालिका लावणार आहे. खेळणी, सायकली, जुने महत्वाचे पुस्तके व ईकचरा महापालिका प्रभाग समिती कार्यालयात नागरिकांनी जमा करण्याचे अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी सांगितले. त्यासाठी विशिष्ट पथक प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात तैनात केले. तसेच एक नंबर देण्यात आला आहे. नागरिकांनी या नंबरवर फोन केल्यास, महापालिकेचे पथक थेट नागरिकांच्या घर सामान घेण्यासाठी जाणार आहेत. 

महापालिकेच्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद
महापालिकेच्या आगळ्यावेगळ्या स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून गरीव व गरजू मुलांना खेळण्यास खेळणी व सायकली मिळणार आहेत. तसेच जुन्या महत्वाच्या पुस्तकातून एक अत्यंत चांगले ग्रंथालय उभे राहण्याची शक्यता आहे. तसेच ईकचरा जमा केल्याने, त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येणार आहे.

Web Title: Discussion of Ulhasnagar Municipal Cleanliness Campaign; Toys will be collected and given to poor children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.