उल्हासनगर: चक्क गटाराच्या पाण्यात धुवून घेतल्या भाज्या; VIDEO व्हायरल झाल्याने खळबळ

By सदानंद नाईक | Updated: February 27, 2025 19:54 IST2025-02-27T19:51:21+5:302025-02-27T19:54:47+5:30

खेमानी मार्केटमधील किळसवाणा प्रकार उघड

disgusting! vegetables washed by sewage water in Khemani Market of Ulhasnagar video goes viral | उल्हासनगर: चक्क गटाराच्या पाण्यात धुवून घेतल्या भाज्या; VIDEO व्हायरल झाल्याने खळबळ

उल्हासनगर: चक्क गटाराच्या पाण्यात धुवून घेतल्या भाज्या; VIDEO व्हायरल झाल्याने खळबळ

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील खेमानी भाजी मार्केट मध्ये ऐक भाजी विक्रेता चक्क गटाराच्या पाण्यात बुडवून पालेभाज्या धुतल्या जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकाराने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊन भाजी विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.

उल्हासनगर कॅम्प-२ येथील खेमाणी परिसरात अवैधपणे भाजी मार्केट भरत आहे. या मार्केटमधला ऐक भाजी विक्रेता गटारीच्या पाण्यात भाज्या बुडवून धुत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घातक भाज्याची विक्री केली जात असल्याने, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. इतकंच नव्हेतर, बादलीने या गटाराचं पाणी काढून तो भाज्यांवर मारतो.

या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तर दुसरीकडे भाज्या गटारीच्या पाण्यात धूत असल्याचे उघड झाले. अशा भाजी विक्रेत्यांवर महापालिकेने पुढाकार घेऊन कारवाई करण्याची मागणी होत असून राजकीय पक्ष पदाधिकारीही संतप्त झाले.

Web Title: disgusting! vegetables washed by sewage water in Khemani Market of Ulhasnagar video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.