उल्हासनगर महापालिका मुख्यालयात ऊर्जा बचत करणाऱ्या विजेच्या उत्पादनांचे प्रदर्शन
By सदानंद नाईक | Published: November 30, 2023 06:17 PM2023-11-30T18:17:33+5:302023-11-30T18:18:27+5:30
उल्हासनगर महापालिकेने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ऊर्जा बचत करणाऱ्या विजेच्या उत्पादनाचे प्रदर्शन मुख्यालय सभागृहात आयोजित केले.
उल्हासनगर : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ऊर्जा बचत करणाऱ्या विजेच्या उत्पादनाचे प्रदर्शन महापालिका मुख्यालय महासभा सभागृहात ठेवले. प्रदर्शनाचे उदघाटन आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते झाले असून यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर।लेंगरेकर, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे यांच्यासह महापालिकाअधिकारी, कर्मचारी आदीजन उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिकेने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ऊर्जा बचत करणाऱ्या विजेच्या उत्पादनाचे प्रदर्शन मुख्यालय सभागृहात आयोजित केले. निसर्गातील भुमी, वायु, जल, अग्नि व आकाश या पाच घटकांपैकी अग्नि या घटकांतर्गत ऊर्जेची बचत व ऊर्जेचे संवने करण्याबाबत शहरवासियात जनजागृती करणेच्या दृष्टीने आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासह उपायुक्त सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता हनुमंत खरात, पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत यांच्या समन्वयाने गुरवारी महापालिका मुख्यालयातील महासभा सभागृहामध्ये ऊर्जा बचत करणा-या विजेच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ऊर्जा बचतीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नियमित वेगवेगळ्या कारणाने विजेचा वापर करत असतो. तर आधुनिक उत्पादनांचा वापर केल्यास कशाप्रकारे ऊजेंची बचत होईल याबाबत नागरीकांमध्ये जाणीव होणे आवश्यक आहे. असे आयुक्त अजीज शेख यांनी यावेळी सांगितले.
महापालिकेच्या ऊर्जा बचत प्रदर्शनात कॉम्टन ग्रीव्हन, पॉलीकॅब, चतुर लाईटस अशा सुमारे १४ कंपन्यांनी विजेची उत्पादने प्रदर्शित केली होती. सदर प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने उल्हासनगर शहरातील माजी नगरसेवक, शाळांचे शिक्षक वर्ग, आयटीआयचे विद्यार्थी, महाविद्यालयातोल विद्यार्थी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच काही अशासकिय संस्था व त्यांचे प्रतिनीधी यांनी भेट दिली. ऊर्जा बचत करणा-या विजेच्या उत्पादनांचे प्रदर्शनास आमदार गणपत गायकवाड यांनी देखोल भेट दिली आहे.