एमआयडीसी फेज-२ मधील महापालिकेच्या अस्वच्छतेवर नागरीकांची नाराजी

By अनिकेत घमंडी | Published: October 2, 2023 07:29 PM2023-10-02T19:29:35+5:302023-10-02T19:29:57+5:30

पाच महिन्यांपासून साचला कचरा महापालिकेचे दुर्लक्ष

Displeasure of the citizens over the unsanitary nature of the Municipal Corporation in MIDC Phase-2 | एमआयडीसी फेज-२ मधील महापालिकेच्या अस्वच्छतेवर नागरीकांची नाराजी

एमआयडीसी फेज-२ मधील महापालिकेच्या अस्वच्छतेवर नागरीकांची नाराजी

googlenewsNext

डोंबिवली: महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त शहरातील।हमरस्त्यांचा परिसर कचरा मुक्त झाला असला तरीही एमआयडीसी फेज२ मध्ये स्वच्छता झाली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

तेथे पाच महिने कचरा साचून आहे तरीही तेथे महापालिका कोणतीही कार्यवाही करत नसल्याने सोमवारी मनसे विभाग प्रमुखाने केली महापालिकेच्या दुर्लक्षितपणावर टीका करून पोलखोल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर रविवारी प्रत्येक पक्षातील राजकारण्यांनी देशामध्ये प्रत्येक ठिकाणी स्वच्छता साठी एक तास दिला. त्यामध्ये केंद्रीय।पंचायत राज राज्यमंत्री कपिल।पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदींनी सहभाग घेतला.

परंतू मुख्य रस्त्यावर फक्त साफसफाई करून समाधान मानलं पण कोकाटे यांनी त्या स्वच्छतेची पोलखोल केली. एमआयडीसी परिसरात गेले पाच महिने कचरा तसाच पडून आहे, त्यामुळे इकडे कचऱ्याचे साम्राज्य साचले आहे. शिवाय रस्त्यांची चाळण झाल्यामुळे खड्डे पडलेले आहेत. त्या परिसराची स्वच्छता व्हावी, त्यात सातत्य असावे मनपाच्या घनकचरा विभागाने येथे लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. 

Web Title: Displeasure of the citizens over the unsanitary nature of the Municipal Corporation in MIDC Phase-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.