आव्हाड आणि आहेर यांच्यातील वाद शिगेला, आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी आक्रमक

By अजित मांडके | Published: February 16, 2023 04:32 PM2023-02-16T16:32:58+5:302023-02-16T16:42:29+5:30

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियाला संपविण्याची महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची कथित ऑडीओ क्लिप वायरल झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

Dispute between Awad and Aher Shige A case against Aher - Nationalist aggressor | आव्हाड आणि आहेर यांच्यातील वाद शिगेला, आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी आक्रमक

आव्हाड आणि आहेर यांच्यातील वाद शिगेला, आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी आक्रमक

googlenewsNext

ठाणे :  राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियाला संपविण्याची महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची कथित ऑडीओ क्लिप वायरल झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी महेश आहेर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर आव्हाड यांच्या पत्नीने देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच आहेर यांच्या कार्यालयातील शिपाई कशा पध्दतीने पैसे मोजण्याचे काम करीत आहे, याचे ट्विटही सध्या वायरल झाले आहे. मात्र आहेर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत, उलट माझ्या विरोधात हत्येची सुपारी काहींनी घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरवात केल्यानेच माझ्यावर हे आरोप करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह कुटुंबाला संपविण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकुर याच्या मदतीने शुटर तैनात केले असल्याची महेश आहेर यांची कथीत ऑडीओ क्लिप वायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या क्लिपनंतर  राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी महेश आहेर यांना मारहाण केली. त्यानंतर  राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. मात्र आहेर यांची कथीत आॅडीओ क्लिप देऊनही त्यांच्या विरोधात अद्यापही गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.

दुसरीकडे सोशल मिडियावर आणखी एक व्हिडिओ वायरल झाला असून या व्हिडीओत महेश आहेर यांच्या कार्यालयातील कर्मचारी पैसे मोजत असल्याचे त्यात दिसत आहे.

वशीला असला तर काही मिळविता येते - जितेंद्र आव्हाड

मित्राचा फोन आल्यानंतर मी ते ट्विट करुन टाकले. मात्र या ऑडीओमध्ये मी दिवसाला ४० लाख आणतो आणि २० लाख वाटतो, महापालिका म्हणजे कुबेराचा खजीना आहे का? मी बाबाजीचा खास आहे, बाबाजी आहे कोण? हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकुर आहे. म्हाडात १०० फ्लॅट खोट्या सह्या करुन वेगवेगळ्या माणसांना विकले आहेत. गेल्या अनेक वर्षे इस्टेट विभाग त्यांच्या ताब्यात आहेत. महापालिकेच्या इस्टेटीचे बारा वाजविले आहेत. त्यामुळे त्याची चौकशी लावली तर सर्व सत्य समोर आहे, त्याची शैक्षणिक पात्रता देखील खोटी आहे. त्याचे १२ वीचे सर्टीफीकेटही खोटे आहे. या महापालिकेत वशीला असला तर फक्त आयुक्त होता येत नाही, मात्र इतर कोणतेही पदे भुषविता येतात.

मी हे केले नसते, मात्र आता डोक्यावरुन पाणी जायला लागले आहे. त्यामुळेच मला हे पाऊल उचलावे लागले. एवढे होऊन त्याचे साधे टेबलही हलविले जाणार नाही, महापालिका आयुक्त किंवा पोलीस यात काही करु शकत नाहीत, ते हतबल आहेत. फक्त हा बाबाजी कोण आहे, याची माहिती पोलिसांनी घ्यावी.

त्या क्लिपमधील आवाजाबाबात मला माहित नाही - महेश आहेर

ती क्लिप काय आहे, हे मला माहित नाही. परंतु त्यातील आवाज माझा नाही, २०१९ पासून मी मुंब्य्राचा सहाय्यक आयुक्त होतो, तेव्हा मी येथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करीत होतो. तेव्हापासून मला मारण्याचा कट केला जात होता, मला काही लोकांकडून धमक्या येत होत्या. आव्हाड यांच्याशी बोलण्यास आम्ही घाबरतो, कारण ते संभाषण टेप करुन वायरल करतात. ते सांगतील तशा कारवाया कराव्या लागत होत्या. माझ्या मतदार संघात मी सांगेण तसेच झाले पाहिजे. मला आणि माझ्या कुटुंबाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून धोका आहे.

अशा घटना घडणार असतील तर चुकीचे आहे. मात्र जोपर्यंत चौकशी होणार असेल तर तो पर्यंत महेश आहेर ला निलंबित करावे. आमच्या कुटुंबाला धमकावले गेले आहे,  बाबाजी कोण आहे, हे पोलिसांनी तपासले पाहिजे. महेश आहेर हे यापूर्वी देखील धमक्या देत होते. मुख्यमंत्र्यांना मी हेच सांगू इच्छिते, की आता बस करा, खुप झाले. पोलिसांना विनंती आहे की या आॅडीओ क्लिपचा योग्य तो तपास करावा.

ऋुता आव्हाड 

आॅडीओ क्लिपमधील आवाज हा महेश आहेर यांचाच आहे, त्यांनी जे यात संभाषण केले आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांची ती उत्सुर्फ्त प्रतिक्रिया होती. परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र महेश आहेर यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. आव्हाड यांच्यावर वारंवार खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, पोलिसांनी या प्रकरणी योग्य न्याय करावा.

आनंद परांजपे - शहर अध्यक्ष - राष्ट्रवादी - ठाणे

Web Title: Dispute between Awad and Aher Shige A case against Aher - Nationalist aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे