ठाण्यात शाखेवरुन राडा; ठाकरे अन् शिंदे गट आमने-सामने, पोलिसांचा फौजफाटा तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 10:21 PM2023-03-06T22:21:40+5:302023-03-06T22:31:22+5:30

ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवसेनेचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

Dispute over shivsena shakha in Thane; Thackeray and Shinde group faced each other, police force deployed | ठाण्यात शाखेवरुन राडा; ठाकरे अन् शिंदे गट आमने-सामने, पोलिसांचा फौजफाटा तैनात

ठाण्यात शाखेवरुन राडा; ठाकरे अन् शिंदे गट आमने-सामने, पोलिसांचा फौजफाटा तैनात

googlenewsNext

ठाणे: ठाण्यात पुन्हा एकदा शाखेवरुन वाद ऐरणीवर आला आहे. ठाण्यातील शिवाईनगर येथे शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेना आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. यावेळी शिंदे गटाने जबरदस्ती ही शाखा बळकवल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून शाखेच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शाखेबहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. हा वाद चिघळू नये, यासाठी ठाणे पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश लागू करून गर्दी पांगवण्यासाठी सुरुवात केली. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा शाखेबाहेर तैनात करण्यात आला होता. 

ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवसेनेचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या शाखेच्या वादातून शिवसेना आणि ठाकरे गट एकमेकांच्या समोर आले आहे. शिवाईनगर येथील शाखा बंद असताना त्याला टाळे लावलेले असताना त्या शाखेचे टाळे तोडून शिवसेनेकडून शाखेत प्रवेश करत शाखा बळकावल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. शिवाईनगरची शाखा ही गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून विरोध दर्शवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेच्या शाखेच्या वादातून परिसरात एकच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. कायदा आणि सुव्यस्थेचा कुठलाही प्रश्न उभा राहू नये यासाठी ठाणे पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश लागू करून गर्दी पंगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्ती करत वाद निवळण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे गटाकडून यावेळी शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा शाखेच्या ताब्यावरून वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोर्टाचे कुठलेही आदेश नसताना यांना टाळे तोडण्याचा हक्क कोणी दिला. जर यांना तो हक्क दिला असेल तर तो हक्क पोलिसांनी समजावून द्यावा. हे अनधिकृत कृत्य आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बोघडवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील लोकशाही संपुष्टात येईल का, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागली असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. तसेच जर शिवाईनगर येथे कायदा आणि सुव्यवस्था बिघावयची नसेल तर या शाखेचा निर्णय जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय घेणार नाही तो पर्यंत या शाखेचा ताबा पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवावी अशी विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. 

शिवाईनगर हा मतदार संघ आमदार प्रताप सरनाईक यांच्या अधिपत्याखाली येत असून या ठिकाणचा संपूर्ण कारभार प्रताप सरनाईक हे सांभाळतात. या ठिकाणचे तीनही नगरसेवक आणि संपूर्ण पदाधिकारी आमच्या समवेत आहेत. परंतु काही लोक याठिकाणी आपला ताबा आणि मालकी हक्क दाखवण्याचं प्रयत्न करत होते. त्यामुळे ही शाखा प्रताप सरनाईक यांनी बांधलेली असून येथील स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी या शाखेत बसायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये विरोध असण्यासारखे काहीच नसल्याचे शिवसेना प्रवक्ते आणि ठाणे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. 

Web Title: Dispute over shivsena shakha in Thane; Thackeray and Shinde group faced each other, police force deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.