ठाणे महापालिकेचा 2755.32 कोटींचा अर्थसंकल्प सादर, स्थायी समितीत गदारोळ                      

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 12:44 PM2021-02-05T12:44:10+5:302021-02-05T14:35:16+5:30

Thane Budget 2021 : 2014 पासून मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात काय झालं?, मागील वर्षात मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात काय झालं? अशा घोषणा देत त्यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

Dispute in the Standing Committee over the discussion of the budget | ठाणे महापालिकेचा 2755.32 कोटींचा अर्थसंकल्प सादर, स्थायी समितीत गदारोळ                      

ठाणे महापालिकेचा 2755.32 कोटींचा अर्थसंकल्प सादर, स्थायी समितीत गदारोळ                      

Next

ठाणे - अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 2014 पासून मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात काय झालं?, मागील वर्षात मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात काय झालं? अशा घोषणा देत त्यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या गोंधळातच आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांनी अर्थसंकल्पावरील भाषण सुरू केले. तरीसुद्धा विरोधकांचा हा सावळा गोंधळ सभागृहात सुरू होता. 2014 पासून बजेटचे क़ाय झाले?, मागील बजेटचे क़ाय झाले?, कधी मांडले आणि कधी मंजूर झाला? याची मागणी माजी विरोधीपक्ष नेते हणमंत जगदाळे यांनी केली आहे.

"आजपर्यंत 2020- 21 ची कल्पना याचे आम्हाला काही फक्त स्वप्न, त्याचे स्वरूप काय, त्याचे झाले काय?, फक्त यादी आणि 455 कोटी भोवती गुंडले गेले आहे. १३१ नगरसेवक आणि सभागृहाचा अपमान तसेच वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जात आहे. ३१ मार्चपर्यंत मंजूर केले जात नाही. अर्थसंकल्पात सावळागोंधळ" केल्याचा आरोप करण्यात येत आहे. कायदा धाब्यावर बसवण्याचे काम सभागृहात केले. अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. यादी कोणी तयार केली हे समोर आलं पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील चव्हाण यांनी केली आहे. 

ठाणे महापालिकेचा 2755.32 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 

महत्वाच्या बाबींसाठी केलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.

१) पाणी पुरवठा पाणी पुरवठा विभागात भांडवली कामांसाठी रु. ११४ कोटी २९ लक्ष तरतूद करण्यात आली आहे.

२) मलनिःसारण या विभागासाठी रु.७२ कोटी ५० लक्ष तरतूद करण्यात आली असून प्रकल्पांतर्गत भुयारी गटार योजना व अमृत योजनेसाठी रु. ५० कोटी ६९ लक्षची तरतूद प्रस्तावित आहे.

३) पूल प्रकल्प पूल प्रकल्पांसाठी एकूण रु.४८ कोटी १७ लक्ष तरतूद प्रस्तावित आहे.

४) रस्ते विकसन रस्ते विकसनासाठी विविध लेखाशीर्षांतर्गत रु. २४० कोटी २५ लक्ष तरतूद प्रस्तावित आहे.

५) रस्त्यावरील दिवाबत्ती या विभागांतर्गत रु. ३६ कोटी ३३ लक्ष तरतूद भांडवली कामांसाठी सन २०२०-२१ मध्ये प्रस्तावित

आहे.

६) आरोग्य सुविधा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व इतर रुग्णालयांमधील उपकरणे व इतर कामांसाठी रू. २७ कोटी १० लक्ष तरतूद करण्यात आली आहे.

७) घनकचरा व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापनासाठी रु.२९ कोटी २० लक्ष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

Web Title: Dispute in the Standing Committee over the discussion of the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.