उल्हासनगरात भाजपातील वाद चव्हाट्यावर; आयलानींमुळेच गुन्हा दाखल, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्तां यांचा आरोप
By सदानंद नाईक | Updated: September 20, 2024 19:05 IST2024-09-20T19:05:01+5:302024-09-20T19:05:14+5:30
उल्हासनगर भाजपचे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्तां यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका जागेच्या वादातूनव हाणामारीतून गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगरात भाजपातील वाद चव्हाट्यावर; आयलानींमुळेच गुन्हा दाखल, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्तां यांचा आरोप
उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा आमदार आयलानी यांच्या कुरघोडीमुळे झाल्याचा आरोप शहर भाजपा उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन केल्याने, शहर भाजपातील वाद चव्हाट्यावर आले. तर गुप्ता यांना मदतीचा हात प्रत्येकवेळी दिला असून गुप्ता यांची कृती पक्ष विरोधी आहे. त्यामुळे याची तक्रार वरिष्ठकडे करणार असल्याचे आयलानी म्हणाले.
उल्हासनगर भाजपचे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्तां यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका जागेच्या वादातूनव हाणामारीतून गुन्हा दाखल झाला. याबाबत गुप्ता यांनी गुरवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे आमदार कुमार आयलानी त्यांच्यावर कुरघोडी व विरोधकांना सहयोग करीत आहेत. त्यामुळे आपणावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप केला. त्याचा संपूर्ण रोख आमदार कुमार आयलानी यांच्याकडे असून संजय गुप्ता विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आपला आमदार उमेदवारीचा दावा फेटाळला जावा व आपले चरित्र खराब करण्यामागे आयलानी असल्याचेही गुप्ता म्हणाले. तर जागेच्या वादातून गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याबाबत आपल्याला काहीएक कल्पना नाही. मात्र गुप्ता यांना मदतीचा नेहमी हात दिल्याचे आमदार कुमार आयलानी म्हणाले.
आरपीआय महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा
ज्या जागेच्या वादातून संजय गुप्ता यांच्यावर हाणामारीचा गुन्हा दाखल झाला. त्या जागेत आरपीआय महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश करून झेंडा लावून गुप्तां यांच्या कारखान्यातील कामगारांना दम व शिवीगाळ केल्याचा गुन्हा गुरवारी दाखल झाला.
गुन्हा खोटा...माजी उपमहापौर भगवान भालेराव
रिपाइंच्या महिला कार्यकर्त्या ह्या मित्र मुकेश वाधवा यांच्या समर्थनार्थ जाऊन त्यांनी वाधवा यांच्या जागेवर झेंडे लावले. या रागातून खोटा गुन्हा दाखल केल्याची प्रतिक्रिया माजी उपमहापौर व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी दिली.