वीज खंडित, प्राथमिक आरोग्य केंद्रे अंधारात

By admin | Published: March 6, 2016 01:40 AM2016-03-06T01:40:09+5:302016-03-06T01:40:09+5:30

या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याने ती अंधारात आहेत. त्यामुळे रुग्णांवर अंधारात उपचार करण्याची वेळ आली आहे.

Disrupted electricity, primary health centers in the dark | वीज खंडित, प्राथमिक आरोग्य केंद्रे अंधारात

वीज खंडित, प्राथमिक आरोग्य केंद्रे अंधारात

Next

हुसेन मेमन,  जव्हार
या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याने ती अंधारात आहेत. त्यामुळे रुग्णांवर अंधारात उपचार करण्याची वेळ आली आहे.
जव्हार तालुक्यात साकुर, साखरशेत, जामसर, नांदगाव, या चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या चारही आरोग्य केंद्रांचे वीजबील गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून थकले आहे. महावितरणने प्राथमिक आरोग्य
केंद्राना गेल्या महिन्यांपासून वारंवार सूचना लेखी निवेदने देऊनही ते भरण्यात न आल्याने ही कारवाई महावितरणने केली. त्यामुळे ही केंद्रे फक्त दिवसाच रुग्णसेवा देऊ शकत आहेत.
अगदी तातडीच्या परिस्थितीत मेणबत्ती अथवा चिमणीच्या प्रकाशात किंवा इमर्जन्सी व लॅम्पच्या प्रकाशात कसेबसे उपचार केले जातात. या केंद्रात रात्री-बेरात्री उपचारासाठी रोज शेकडो रुग्ण येतात. मात्र दोन दिवसांपासून वीजपुरवठा नसल्याने रुग्णांवर अंधारात उपचार केले जात आहेत. या केंद्रांचे ७ ते ८ महिन्यांपासून ३ लाख ५० हजाराचे लाईट बिल थकलेले आहे. आरोग्य केंद्रांना विद्युत लाईट नसल्याने, शीतगृहात व फ्रीजमध्ये टी.टी.चे इंजेक्शन, पोलिओ, लस, रक्त पिशवी,
औषधे, इंजेक्शन फ्रीजमध्ये ठेवावे लागतात. परंतु आता फ्रीजही बंद आहे.
प्रशासनाने विजेची बिले भरून या आरोग्य केंद्राचा पुरवठा तातडीने सुरू करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य- रतन बुधर, व जव्हार पंचायत समिती सदस्य- सुधाकर वळे, व मनोज गावंढा यांनी केली आहे. अन्याथा जव्हार एमएसीबीवर आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
पावसामुळे झाडे उन्मळलीजव्हार : या शहरात गुरूवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जव्हार शहराला चांगलेच झोडपले, मुकणे आळीतील सदू मुकणे व अरूण सहाने याच्या दुकानावर व परिसरातील मोटरसायकलींवर भले मोठे आंब्याचे झाड उन्मळून पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शहरात काही ठिकाणी मोठ मोठी झाडे पडली. परंतु आसपास घरे अगर इतर कोणीही नसल्यामुळे कुठलेही नुकसान झालेले नाही. जव्हार नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे प्रमुख अखलाक कोतवाल आणि त्यांचे सहकारी यांनी तातडीने मनुष्यबळ वापरून झाडांच्या फांद्या कापून रस्ता मोकळा केला आहे.
जव्हार मधील जुनी डॅम आळी येथील रहिवाशांच्या काही घरांचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले आहे, तर काही तुंबलेल्या गटारीत आलेले पावसाचे पाणी नासीर मेमन यांच्या घरात घुसून सर्वत्र दुर्गधी पसरली होती, त्यामुळे काही घरातील मंडळींना घर धुवून काढावे लागले, तसेच जव्हार तालुक्यातील खेडोपाड्यातही काजू व आंब्यांच्या बागांचे मोहोर गळल्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे.
त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेले आहे, गेल्या दोन तीन वर्षापासून फेब्रुवारी व मार्र्च महिन्यात अचानक अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात आंबा व काजूची आवक कमी होत चालली आहे, मेहनत करून फळ मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे नुकासान सहन करण्याखेरीज दुसरे काहीच करता येत नाही, आणि शासनाच्या तटपुंज्या भरपाईमुळे झालेले नुकसान भरून निघत नाही असे शेतकऱ्यांनी बोलतांना सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Disrupted electricity, primary health centers in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.