स्वबळाचा नारा देणा-या काँग्रेसमधील असंतोष कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:16+5:302021-08-21T04:45:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गटातटांत विखुरलेल्या ठाणे शहर कॉंग्रेसने पुन्हा एकदा आगामी ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा ...

Dissatisfaction persists in Congress with slogan of self-reliance | स्वबळाचा नारा देणा-या काँग्रेसमधील असंतोष कायम

स्वबळाचा नारा देणा-या काँग्रेसमधील असंतोष कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गटातटांत विखुरलेल्या ठाणे शहर कॉंग्रेसने पुन्हा एकदा आगामी ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा दावा केला आहे. त्यातही या निमित्ताने विविध पदांची खैरात वाटण्याचे कामही शहर कॉंग्रेसने सुरू केले आहे. पदांच्या आशेने तरी प्रत्येक कार्यकर्ता ब्लॉक लेव्हलला काम करेल आणि त्यातून पक्षबांधणीस मदत होईल, अशी अपेक्षा शहर कॉंग्रेसला आहे. असे असले तरी आजही शहर कॉंग्रेसमध्ये पदवाटपावरून पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद आहे. मर्जीतल्या मंडळींना महत्त्वाची पदे दिली जात असून मर्जीत नसलेल्यांना खालची पदे दिली जात असल्याने ती आहे. ती श्रेष्ठी दूर करून गटातटांचे राजकारण कसे संपुष्टात आणणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्लॉक क्रमांक ८ च्या नवीन पदाधिका-यांना नियुक्तीपत्र वितरणाचे आयोजन गुरुवारी शहर कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष संदीप शिदे यांनी केले होते. याप्रसंगी ठाणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, ठाणे जिल्हा इंटक कॉंग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाचे प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत तसेच पारंपरिक मतदारही आहेत. परंतु, आपला कार्यकर्ता त्याठिकाणी पोहोचला पाहिजे. शहरी भागातून यापूर्वी अनेक काँग्रेसचे नगरसेवक निवडून येत होते. मात्र, काही वर्षांपासून आपले शहरातील वर्चस्व कमी झाल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. याचाच अर्थ त्यांनादेखील शहर कॉंग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी माहीत आहे. त्यातूनच हे वक्तव्य केले असावे, अशी चर्चादेखील आता केली जात आहे. त्यामुळे त्यांनीही अंतर्गत गटबाजी दूर करून येणा-या निवडणुकीत एकसंध राहणे गरजेचे आहे.

Web Title: Dissatisfaction persists in Congress with slogan of self-reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.