जि. प. शेलवली बांगर शाळेच्या १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

By सुरेश लोखंडे | Published: February 8, 2024 06:12 PM2024-02-08T18:12:24+5:302024-02-08T18:13:03+5:30

ठाणे : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राज्य परीक्षा परिषद पुणेजर्फे आयोजित शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा अंतिम निकाल आज घोषित ...

Dist. W. 15 students of Shelvali Bangar School succeed in scholarship exam | जि. प. शेलवली बांगर शाळेच्या १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

जि. प. शेलवली बांगर शाळेच्या १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

ठाणे : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राज्य परीक्षा परिषद पुणेजर्फे आयोजित शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा अंतिम निकाल आज घोषित झाला. त्यात शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेलवली बांगर केंद्र अल्याणी येथील १५ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यात दोन आदिवासी कातकरी समाजाच्या विद्यार्थिनींही समावेश आहे.

या शाळेचे तब्बल १७ विद्यार्थी या परीक्षेला बसले हाेते. त्यापैकी तब्बल १५ विद्याथी उत्तीण झाले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये योगिता व्यापारी, मेघना बांगर, श्रेयस बांगर, मुस्कान शेख, शिवानीग बांगर, वेदांत बांगर, पार्थ धानके, जयदीप भोईर, करण बांगर, कुमुद निमसे, गणेश आगिवले, तन्वी मुकणे, तेजस बांगर, प्रथमेश भोईर आणि ज्योती मुकणे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. गटशिक्षणाधिकारी. भाऊसाहेब चव्हाण, विस्ताराधिकारी संगीता माळी, केंद्रप्रमुख डॉ. राजेंद्र चौधरी, मुख्याध्यापक बाळू धानके, वर्गशिक्षक सुधाकर पाटील यांनी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने केलेले मार्गदर्शन हिताचे ठरले आहे. याशिवाय शाळेतील हरी गावंडा, रेखा पाटील, रामदास बांगर, काशिनाथ शिंदे, महेश तारमळे आदी शिक्षकांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरतभाऊ बांगर आणि सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Dist. W. 15 students of Shelvali Bangar School succeed in scholarship exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे