जि. प. ने आणल्या नव्या नावीण्यपूर्ण योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:40 AM2021-03-20T04:40:47+5:302021-03-20T04:40:47+5:30

याशिवाय शिक्षण खात्यातील मालमत्तेचे, अभिलेख सर्वेक्षण, संरक्षण व संवर्धन करण्याच्या योजनेसह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाआरोग्य शिबिर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये घेणे, ग्रामपंचायतींच्या ...

Dist. W. Brought new innovative schemes | जि. प. ने आणल्या नव्या नावीण्यपूर्ण योजना

जि. प. ने आणल्या नव्या नावीण्यपूर्ण योजना

Next

याशिवाय शिक्षण खात्यातील मालमत्तेचे, अभिलेख सर्वेक्षण, संरक्षण व संवर्धन करण्याच्या योजनेसह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाआरोग्य शिबिर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये घेणे, ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, कृषीच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना आदी नवीन योजना या अर्थसंकल्पात नमूद केल्या आहेत.

*कोणत्या विभागाला किती निधी

या अर्थसंकल्पात बांधकाम विभागाला सर्वात जास्त म्हणजे १९ कोटी ६६१ लाखांची तरतूद केली आहे. शिक्षण विभागाला १६ कोटी ५५ लाख, समाजकल्याणसाठी ५ कोटी ६ लाखांची, महिला बालकल्याणला ४ कोटी ९९ लाख तरतूद केली आहे. पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्ती, नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी ३ कोटी ७५ लाखांची तरतूद केली आहे. या खालोखाल पशुसंवर्धनासाठी ३ कोटी ११ लाख, कृषी विभागासाठी २ कोटी ६४ लाख तरतूद केली आहे.

कृषीला न्याय मिळवून देण्यासाठी सदस्य उल्हास बांगर यांनी भरीव वाढ करण्याची मागणी केली. उत्पन्न वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करण्याची गरज सुभाष घरत यांनी व्यक्त केली. या नावीण्यपूर्व योजना घेतल्यामुळे अर्थसंकल्प चांगला झाला असून टॅंकरमुक्त जिल्ह्यासाठी पाणीपुरवठ्यावर तरतूद करण्याची मागणी गोकूळ नाईक यांनी केली.

Web Title: Dist. W. Brought new innovative schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.