बालक,  तरुणांना ‘एलबेनडॉले’ जंतनाशक औषधाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 02:26 AM2021-03-06T02:26:08+5:302021-03-06T02:26:15+5:30

जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा उद्देश

Distribution of ‘Albendole’ deworming medicine to children and youth | बालक,  तरुणांना ‘एलबेनडॉले’ जंतनाशक औषधाचे वाटप

बालक,  तरुणांना ‘एलबेनडॉले’ जंतनाशक औषधाचे वाटप

Next

 


सुरेश लोखंडे
 लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या या कालावधीनंतरही १ ते ६ वर्षांच्या बालकांसह जिल्ह्यातील १९ वर्षीय युवा-युवतींच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदी आरोग्ययंत्रणेकडून आठवडाभर म्हणजे ८ मार्चपर्यंत ’एलबेनडॉले’ या औषधी गोळ्यांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. या गोळ्या देऊन या युवा-युवती व बालकांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
 जिल्ह्याभरात या आधीच पोलिओ डोस देण्याच्या दृष्टीने सक्रिय असलेल्या यंत्रणेव्दारे व आरोग्यविभाग आणि अंगणवाडीसेविका, मदतनीस यांच्याद्वारे या औषधी गोळ्या वाटप करण्यात येत आहे. यामुळे या बालकांसह शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे शक्य झाले आहेत. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून झाला आहे.  या गोळ्यावाटपाची ही मोहीम ८ मार्चपर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

कोविडमुळे घरोघरी करणार गोळ्यांचे वाटप
ठाणे : सरकारी, खासगी शाळा, अंगणवाडी केंद्र कोविडमुळे सद्य:स्थितीत बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन आरोग्य परिचारिका, कर्मचारी या औषधी गोळ्यांचे वाटप करणार आहेत. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणीकरिता जिल्हास्तरीय सुकाणू समिती गठित केली आहे. या समितीची बैठक नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसंचालक डॉ. गौरी राठोड, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे उपस्थित असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी रेंघे यांनी सांगितले.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान द्यावयाच्या गोळीचे प्रमाण तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी व शाळेच्या शिक्षकांना देण्यात आले आहेत. 
    - डॉ. मनीष रेंघे,जिल्हा आरोग्य     अधिकारी

Web Title: Distribution of ‘Albendole’ deworming medicine to children and youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.