शेतकऱ्यांना मत्स्य बीजाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:43 AM2021-08-19T04:43:48+5:302021-08-19T04:43:48+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यातील शेततळ्यातील मत्स्य व्यवसाय करीत असलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभाग आत्मा तालुका कृषी अधिकारी कार्यालय शहापूरच्या अंतर्गत ...
भातसानगर : शहापूर तालुक्यातील शेततळ्यातील मत्स्य व्यवसाय करीत असलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभाग आत्मा तालुका कृषी अधिकारी कार्यालय शहापूरच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मत्स्यबीज वाटप करण्यात आले. शेती व शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हा मुख्य हेतू आहे.
ठाणे व पालघर जिल्ह्याच्या आत्मा प्रकल्प संचालक के.बी.तरकसे, जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने, शहापूर तालुका कृषी अधिकारी अमोल अगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीपूरक व्यवसाय करिता इच्छुक शेततळ्यात मत्स्य व्यवसाय करीत असलेल्या शेतकरी बांधवांना मत्स्य बीज बोटुकली वाटप करण्यात आले. हे मत्स्य बीज खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल येथून उपलब्ध करून तालुका आत्मा कर्मचारी जितेश खांडगे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व विनोद कदम. सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा शहापूर यांनी त्याचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कार्यालय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.