ठाण्यात सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी केले वर्तकनगरमध्ये अन्न धान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 10:08 PM2020-04-19T22:08:12+5:302020-04-19T22:15:34+5:30
काही दानशूर व्यक्तींनी एकत्र येत वर्तकनगर, भिमनगर आणि साईनाथनगर भागातील गरजू नागरिकांना शुक्रवारी अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून आधीच कुपन देऊन अत्यंत शिस्तबद्धरित्या हा उपक्रम राबविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के आणि वर्तकनगर येथील प्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत सातपुते यांच्यासह काही दानशूर नागरिकांनी एकत्र येत वर्तकनगर, भिमनगर आणि साईनाथनगर भागातील गरजू नागरिकांना शुक्रवारी अन्न धान्याचे वाटप केले. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून आधीच कुपन देऊन अत्यंत शिस्तबद्धरित्या हा उपक्रम राबविण्यात आल्याने वर्तकनगर पोलिसांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
वर्तकनगर भागातील काही दात्यांनी दिलेल्या मदतीच्या आधारावर साईनाथनगर येथील गरजू तसेच असहाय्य मजूरांना या मदतीचे १७ एप्रिल रोजी वर्तकनगर येथील शनिमंदिरासमोर वाटप करण्यात आले. कोणताही गोंधळ उडू नये यासाठी या गरजूंना आधीच कुपन देण्यात आली होती. सेवेकऱ्यांनीही सोशल डिस्टसिंगचे अत्यंत काटोकोरपणे पालन केले. चौकटीतच प्रत्येकाला उभे रहायला लावून कुपने घेतल्यानंतर अन्नधान्याची पाकिटे या गरजूंना देण्यात आली. वर्तकनगर पोलीसही यावेळी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये शिवसेना गटनेते दिलीप, प्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत सातपुते, प्रतिक सातोस्कर, संकेत कांबळी, प्रविण पवार, विजय सिंग, विजय धोत्रे, गणेश गुडूपिल्ली, योगिता आत्रे, मीना डार्इंगे, अमृता पुजारी, गीता पवार, ऋतूजा पटेकर आणि पांडे आदींनी सहभाग घेतला. सर्व सेवेकरींचे ‘वर्तकनगर गो कोरोना गो’ सेवा संघातर्फेही आभार व्यक्त करण्यात आले.