मदतीचा घास... उल्हासनगरात २०० गरीब कुटुंबांना धान्य किट वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 09:05 PM2021-08-05T21:05:46+5:302021-08-05T21:06:25+5:30

उल्हासनगरातील गोरगरीब व गरजू नागरिकांना कोरोना काळात दिपा फाउंडेशनचे अध्यक्ष विकास खरात यांनी शेकडो जणांना धान्य किटचे वाटप यापूर्वी केले होते.

Distribution of food kits to 200 poor families in Ulhasnagar | मदतीचा घास... उल्हासनगरात २०० गरीब कुटुंबांना धान्य किट वाटप

मदतीचा घास... उल्हासनगरात २०० गरीब कुटुंबांना धान्य किट वाटप

Next
ठळक मुद्देउल्हासनगरातील गोरगरीब व गरजू नागरिकांना कोरोना काळात दिपा फाउंडेशनचे अध्यक्ष विकास खरात यांनी शेकडो जणांना धान्य किटचे वाटप यापूर्वी केले होते.

उल्हासनगर : दिपा फौंउडेशनच्या माध्यमातून गरीब विधवा आणि गरीब दिव्यांग अशा २०० कुटुंबांना धान्याच्या किटचे वाटप सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्या हस्ते नालंदा शाळा येथे मंगळवारी झाले. यावेळी फौंडेशनचे विकास खरात, राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षा हरकिरण कौर सोनिया धामी, रमा भालेराव आदीजन उपस्थित होते.

उल्हासनगरातील गोरगरीब व गरजू नागरिकांना कोरोना काळात दिपा फाउंडेशनचे अध्यक्ष विकास खरात यांनी शेकडो जणांना धान्य किटचे वाटप यापूर्वी केले होते. तर मंगळवारी नालंदा शाळेच्या प्रांगणात गरीब विधवा व दिव्याग अश्या २०० कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढी धान्याची कीटचे वाटप सभागृहनेते भारत गंगोत्री, राष्ट्रवादी पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष हरकिरण कौर सोनिया धामी, रमा भालेराव, अंबिका शेरखाने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 

दरम्यान, यावेळी वैशाली साळवे, रितेश खराटे, निलेश गायकवाड, विकास जाधव, धनंजय पाटील, वर्षा अविनाश खरात, दिव्याग सेलच्या अध्यक्ष छाया सचिन सावंत आदीजन उपस्थित होते.
 

Web Title: Distribution of food kits to 200 poor families in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.