महाआवास अभियानाच्या पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:46 AM2021-08-17T04:46:47+5:302021-08-17T04:46:47+5:30

अंबरनाथ तालुक्‍यात पंचायत समितीअंतर्गत आवास योजना अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत काही पुरस्कारांचे वितरण शनिवारी पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात ...

Distribution of Mahawas Abhiyan Award | महाआवास अभियानाच्या पुरस्काराचे वितरण

महाआवास अभियानाच्या पुरस्काराचे वितरण

Next

अंबरनाथ तालुक्‍यात पंचायत समितीअंतर्गत आवास योजना अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत काही पुरस्कारांचे वितरण शनिवारी पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले. घरकुल लाभार्थ्यांचा आ. किसन कथोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संपूर्ण राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात आले होते. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट घरकुल, राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत आणि राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तसेच सर्वोत्कृष्ट क्लस्टर अशा विविध स्पर्धा घेतल्या हाेत्या. त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट घरकुलाचा मान रहाटोलीच्या चंद्रकांत दिवेकर यांना मिळाला, तर द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे कुंडलिक जाधव आणि यमुना जाधव यांनी मिळविला. राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट घरकुलाचा मान वांगणीच्या अंकुश गायकवाड यांना मिळाला, तर द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे भरत पवार आणि राजेंद्र जाधव यांना मिळाला.

प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा मान दहिवली ग्रामपंचायतीला देण्यात आला असून द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे हाजीमलंगवाडी आणि वांगणी ग्रामपंचायतीला दिला. तर, राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा मान चामटोली ग्रामपंचायतीला देण्यात आला. चरगाव आणि आंबेशिव या दोन ग्रामपंचायतींना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला. सर्वोत्कृष्ट क्लस्टर योजनेचा मान हाजीमलंगवाडीला देण्यात आला. राज्य पुरस्कृत क्लस्टरचा मान चरगाव ग्रामपंचायतीला देण्यात आला.

Web Title: Distribution of Mahawas Abhiyan Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.