जिल्ह्यातील तिन्ही लाेकसभांच्या उमेदवारीसाठी पहिल्या दिवशी १३४ उमेदवारी अर्ज वाटप; दाेघांची उमेदवारी दाखल !
By सुरेश लोखंडे | Published: April 26, 2024 07:18 PM2024-04-26T19:18:34+5:302024-04-26T19:18:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लाेकसभेच्या उमेदवारी (नामनिर्देशन) अर्जाचे आजपासून तेथील कार्यालयांमधून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लाेकसभेच्या उमेदवारी (नामनिर्देशन) अर्जाचे आजपासून तेथील कार्यालयांमधून वाटप केले जात आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ठाणे लाेकसभेसाठी ४३ अर्ज, तर कल्याणसाठी ३७,आणि भिवंडी लाेकसभेच्या उमेदवारीसाठी ५४ अर्ज आदी मिळून आजच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याभरातून १३४ उमेदवारी अर्जांचे वितरण ठिकठिकाणच्या निवडणूक कार्यालयातून झाले आहे. इच्छुकांकडून अर्ज घेऊन जाण्याची संख्या अधिक असूनही त्यापैकी आज फक्त् दाेन जणांचे उमेदवारी अर्ज कल्याणला जमा करण्यात आले आहेत.
राजकीय पक्षांच्या कार्यालयांसह इच्छुक अपक्षांनी आजच्या पहिल्या दिवशी मात्र उमेदवारी अर्ज घेऊन जाण्याची भूमिका पार पाडली आहे. तर कल्याणमध्ये दाेघांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) या पक्षाकडून सुशिला कांबळे यांच्यासह राईट टू रिकॉल पार्टीचे अमित उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लाेकसभेच्या निवडणुकसाठी आज दाखल झाला, असे निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी सांगितले. यासह आज दिवसभरात या कल्याण लाेकसभेसाठी दिवसभरात ३७ उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात ओले आहेत. यामध्ये अपक्षांकडून १६ अर्ज घेण्यात आले आहेत. तर शिवसेना, बहुजन समाज पार्टीने (आंबेडकर), पिपल्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रत्येकी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर बहुजन समाज पार्टीच्या प्रतिनिधीने तीन आण दलित पँथरच्या प्रतिनिधीने दाेन उमेदवारी अर्ज घेतले आहेत. याशिवाय लोकराज्य पार्टी, राईट टू रिकाॅल पार्टी, राष्ट्रीय किसान बहुजन एसपार्टी आणि बहुजन मुक्ती पार्टी आदी पक्षांच्या प्रतिनधीने प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज घेतल्याची नाेंद
भिवंडी लाेकसभेच्या उमेदवारीसाठी आज सर्वाधिक म्हणजे ५४ उमेदवारी अर्ज गेले आहेत. यामध्ये भाजपाकडून तीन अर्ज नेण्यात आलेले आहेत. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सात अर्ज, धनवान भारत पार्टीने एक अर्ज, सायुंकत भारत पक्षाकडून एक, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीने चार, राष्र्टवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाकडून पाच अर्ज नेण्यात आलेले आहे. याप्रमाणेच पिल्पलस पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी तीन, किसान पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी प्रत्येकी एक अर्ज, लोकराज्य पार्टीकडून दाेन तर अपक्षांकडून २६ अर्ज नेण्यात आले आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ४३ उमेदवारी अर्ज संबंधिताना वितरीत करण्यात आले, असे ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी सांगितले. यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चार उमेदवारी अर्ज आज घेतले आहे. तर पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकने तीन अर्ज घेतले. याप्रमाणेच बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, संयुक्त भारत पक्ष, रिपब्लिकन बहुजन सेना, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, भारतीय जवान किसन पार्टी आदी पक्षांच्या इच्छुकांनी प्रत्येकी दाेन उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तर भारतीय राजनिती विकास पार्टी, आम आदमी पार्टी, भूमिपूत्र पार्टी, बहुजन शक्ती, हिंदुस्थान मानव पक्ष आदी पक्षांच्या इच्छुकांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज घेतलला आहे. या छाेट्यामाेठ्या राजकीय पक्षांप्रमाणेच अपक्ष उमेदवारांनी तब्बल १९ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.