अंबरनाथच्या श्री मलंग गडावरील पाड्यांमध्ये फराळासह कपडे, साड्यांचे वाटप
By सुरेश लोखंडे | Published: November 16, 2023 04:40 PM2023-11-16T16:40:29+5:302023-11-16T16:42:41+5:30
ठाणे : बलिप्रतिपदा, दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गडाच्या कुशीतील आदिवासी वाड्यावस्त्यांमध्ये धर्माभिमानी हिंदू संघटना व श्री मलंग ...
ठाणे : बलिप्रतिपदा, दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गडाच्या कुशीतील आदिवासी वाड्यावस्त्यांमध्ये धर्माभिमानी हिंदू संघटना व श्री मलंग गड भाविक प्रतिष्ठान आदीं संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिवाळी फराळासह कपडे, साड्या वाटप करून या आदिवासी समाजासाेबत दिवाळी साजरी केली आहे.
ऐन दिवाळीत या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट श्रीमलंग गडाच्या कुशीतील आंभेचीवाडी, ढोकेचीवाडी, बांधणवाडी, ब्राम्हण करवले गाव, येथील विठ्ठलवाडी येथे घराेघरी दिवाळी फराळ, कपडे, साड्या वाटप केले. या वेळी धर्माभिमानी हिंदू संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील, सचिव मंगेश भोईर, पदाधिकारी ओमकार पावशे आणि श्री मलंग गड भाविक प्रतिष्ठानचे राजेश गायकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते, असे भारतीय जनता पक्ष (ओबीसी मोर्चा) राज्य उपाध्यक्ष अॲड. भारव्दाज चाैधरी यांनी लाेकमतला सांगितले.