उल्हासनगरात विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांगाना व्हीलचेअरचे वाटप

By सदानंद नाईक | Published: June 2, 2024 08:15 PM2024-06-02T20:15:14+5:302024-06-02T20:15:44+5:30

उल्हासनगर : शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कलवा सिंग यांनी शनिवारी दुपारी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांग महिलेला व्हीलचेअरचे ...

Distribution of educational materials to students and wheelchairs to the disabled in Ulhasnagar | उल्हासनगरात विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांगाना व्हीलचेअरचे वाटप

उल्हासनगरात विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांगाना व्हीलचेअरचे वाटप

उल्हासनगर: शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कलवा सिंग यांनी शनिवारी दुपारी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांग महिलेला व्हीलचेअरचे वाटप केले. शाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी कलवा सिंग यांच्या वतीने शेकडो विध्यार्थांना शैक्षणिक साहित्य दिले जाते.

उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख कलवा सिंग यांच्या वतीने शाळा सुरू होण्यापूर्वी शेकडो गरीब व गरजू मुलांना पेन-वह्या, दफ्तर, छत्री आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी दुपारी अयोध्यानगर येथील शिवसेना शाखेत केले. तसेच दिव्यांग महिलांना व्हीलचेअरचे वाटप केले. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शहरातील रेल्वे व बस स्टेशन, चौक, दुकानाच्या आडोशाला उघड्यावर झोपणाऱ्या गरीब नागरिकांना ब्लेंकेटचे व छत्राचे वाटप केले जाते. तसेच वृद्ध व अनाथ नागरिकांना अन्नधान्याची मदत दिली जाते.

Web Title: Distribution of educational materials to students and wheelchairs to the disabled in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.