उल्हासनगर महापालिकेकडून दिव्यांगांना साहित्याचे वाटप
By सदानंद नाईक | Published: September 23, 2023 07:08 PM2023-09-23T19:08:44+5:302023-09-23T19:09:52+5:30
उल्हासनगर महापालिका दिव्यांग विभागाच्या वतीने दिव्यांग नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविते.
सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका दिव्यांग विभागाच्या वतीने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रात आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख यांच्या हस्ते दिव्यांग नागरिकांना मूलभूत साहित्याचे वाटप केले. तसेच व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
उल्हासनगर महापालिका दिव्यांग विभागाच्या वतीने दिव्यांग नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविते. महापालिका अभ्यासिकेत दिव्यांग नागरिकांना मूलभूत साहित्याचे वाटप आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते देण्यात आले. साहित्यामध्ये व्हिलचेअर, तीन चाकी सायकल, स्मार्ट स्टिक, साधी स्टिक, टॉयलेट खुर्ची आदीचा समावेश होता. तसेच व्यवसायभिमुख प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग लाभार्थ्याना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपायुक्त डॉ. सुभाष जाधव उपस्थित होते. तसेच शहरातील दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, दिव्यांग बांधव यांची उपस्थिती लक्षणीय होती.
दिव्यांग बांधवाना साहित्य वाटप कार्यक्रमाला शहर अभियंता संदिप जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी बाळु नेटके, विधी अधिकारी राजा बुलानी तसेच दिव्यांग संघटनेचे अशोक भोईर, सचिन सावंत, राजेश साळवे, टिकमदास उदासी, रिहाना कुरेशी तसेच प्रहार संघटेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रधान पाटील उपस्थित होते. महापालिका योजनांचा दिव्यांग बांधवानी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त अजीज।शेख यांनीं केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग विभागाचे विभाग प्रमुख राजेश घनघाव व विभागाच्या कर्मचा-यांनी प्रयत्न केले आहे.