भातसा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील ९७ कुटुंबियाना निवासी प्लाॅट वाटपास प्रारंभ
By सुरेश लोखंडे | Published: September 24, 2022 06:48 PM2022-09-24T18:48:31+5:302022-09-24T18:50:14+5:30
मुंबईच्या पाणी पुरवठ्याठी ९६८ साली भातसा धरण बांधण्यात आलेले आहे.
ठाणे : बृहन्मुंबई महानगरपािलकेला पाणी पुरवठा करणार्या भातसा धरणात शेत जमीन गेलेल्या व बेघर झालेल्या ९७ कुटुंबियाना तब्बल ५४ वषार्नंतर निवासी जागेचे प्लाॅट वाटपास आजपासून प्रारंभ झाला. यातील नऊ कुटुंबियांना या प्लाॅटच्या वाटपासह ताबा पावती जिल्हा पुनर्वसन अधिकारी रेवती गायकर यांच्या हस्ते शिनवारी भातसा वसाहतीत झालेल्या कार्यक्रमात सुपुर्द करण्यात आली.
मुंबईच्या पाणी पुरवठ्याठी १९६८ साली भातसा धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामध्ये बाधित झालेल्या ९७ कुटुबियांना सुमारे ५४ वर्षानंतर या िनवासी जागेच्या भुखंडाच्या वाटपाला आजपासून प्रारंभ् झाला आहे. सुमारे नऊ हेक्टरच्या भूखंडामध्ये या बुडीत क्षेत्रातील कुटुंिबयाना िनवासी जागेचे भूखंड वाटप हाेत आहे. या कुटुंिबयांपैकी नऊ जणांना आज या जागेवरील प्लाॅट व साेबत ताबा पावती देण्यात आली. यावेळी भातसाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांच्यासह या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे नेते बबन हरणे,भाऊ महालुंगे, अशोक मोपे आणि बाधित शेतकरी कुटुंब उपस्थित होते.
या िनवासी प्लाॅटसाठी पात्र ठरलेल्या या उर्विरत सर्व कुटुंबानाही पुढील तीन महिन्यात या निवासी भूखंडाचे वाटप होणार आहे. भातसानगरमध्ये असलेला हा निवासी भूखंड अकृषिक असून त्यांना आवश्यक पाणी पुरवठा, रस्ते, गटार अशी सगळ्या सुविधा देण्यात येणार असल्याचे िजल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शहापूर तालुक्यातील या पाल्हेरी,पचिवरे, वाकीचा पाडा, घोडेपाऊल या गावातील या ९७ कुटुंबांना या निवासी प्लॉटचे वाटप हाेत आहेत. या गावांमध्ये तत्काली म्हणजे १९६७ साली ५७२ लोकसंख्या हाेती. तत्कालीन कुटुंबात असलेल्या एकूण सदस्ये संख्येस अनुसरून या िनवासी प्लाॅटचे वाटप हाेत आहे. तीन ते दहा गुंठ्यापर्यंतचे िनवासी भूखंड या भातसा बािधताना दिले जात आहेत.
भातसा धरणासाठी १९६७ या बािधत शेतकर्यांच्या शेत जिमीनीचे भूसंदपादन झाले आहे. तत्कालीन पुनर्वसन कायदा अिस्थत्वात नव्हता. १९७६ हा पुनर्वसन कायदा तयार झाला. त्यात या भातसाच्या बाधीत शेतकर्यांच्या पुनर्वसनची तरतूद नव्हती. ती करून घेण्यासाठी १९९९पर्यंत शासनाकडे मी २७ वषेर् फेर्या मारल्या. त्यानंतर आता अखेरीस आज तो दिवस उगवला आिण या कुटुंिबयाना िनवासी भूखंडाचे वाटपाला प्रारंभ झाल्यामुळे समाधान झाले, असे या शेतकर्यांसाठी लढलेले बबन हरणे यांनी लाेकमतला सांिगतले.