दिवाळीनिमित्त आदिवासी महिलांना साडी व मिठाईचे वाटप
By नितीन पंडित | Published: October 24, 2022 03:56 PM2022-10-24T15:56:08+5:302022-10-24T15:56:57+5:30
लोकसभा क्षेत्रातील सुमारे दोन हजार महिलांना साडी व फराळ यावेळी वाटप करण्यात आले.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: बाळासाहेबांची शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीने भिवंडी लोकसभा क्षेत्रातील गरीब व गरजू आदिवासी महिलांना सोमवारी साडी व दिवाळी फराळ व खाऊचे वाटप करण्यात आले. लोकसभा क्षेत्रातील सुमारे दोन हजार महिलांना साडी व फराळ यावेळी वाटप करण्यात आले.
भिवंडीसह शहापूर, मुरबाड तालुक्यातील गरिब व गरजू नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने बाळ्या मामा यांनी लोकसभा क्षेत्रातील आदिवासी बांधवांना मिठाई व फराळाचे वाटप केले.तर महिलांना भाऊबीज म्हणून साड्या भेट दिल्या.लोकसभा क्षेत्रात सुमारे दोन हजार महिलांना हि भाऊबीज भेट देण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने दिवाळी निमित्य संपुर्ण ठाणे जिल्यातील भिवंडी, शहापुर, मुरबाड अश्या विविध ठिकाणी आदिवासी भागात दोन हजार साडी व मिठाईचे आपण वाटप केले असून यापुढेही हि समाजसेवा अशीच सुरु राहील अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे यांनी यावेळी दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"