नौपाड्यातील ४०० घरेलू कामगार महिलांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:17+5:302021-09-27T04:44:17+5:30
ठाणे : पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय संकल्पनेतून ठाण्यात राबविलेला घरेलू कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार भाजपचे राज्य प्रभारी ...
ठाणे : पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय संकल्पनेतून ठाण्यात राबविलेला घरेलू कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार भाजपचे राज्य प्रभारी सी. टी. रवी यांनी शनिवारी काढले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहानिमित्ताने भाजप तसेच विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने नगरसेवक संजय वाघुले आणि त्यांची कन्या वृषाली यांनी नौपाड्यातील ४०० घरेलू महिला कामगारांची नोंदणी केली होती. या महिलांना सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत शनिवारी प्रमाणपत्र वाटप झाले. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, कोकण प्रभारी तसेच आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदीप लेले, संजय वाघुले आणि नगरसेविका प्रतिभा मढवी आदी उपस्थित होते.