झेप प्रतिष्ठानतर्फे महिला दिनानिमित्त सॅनिटरी पॅड वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:44 AM2021-03-09T04:44:07+5:302021-03-09T04:44:07+5:30
ठाणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून झेप प्रतिष्ठानतर्फे ठाणे आणि डोंबिवली येथील मुलींच्या अनाथाश्रमात सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात ...
ठाणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून झेप प्रतिष्ठानतर्फे ठाणे आणि डोंबिवली येथील मुलींच्या अनाथाश्रमात सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. मासिक पाळीदरम्यान शरीरात होणारे बदल, तसेच यादरम्यान आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल तज्ज्ञांद्वारे मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
भारतातील जवळपास दोन कोटी मुलींना शाळेच्या सुविधांपासून वंचित राहावे लागते. याचे मुख्य कारण म्हणजे मासिक पाळीदरम्यान त्यांना होणारा त्रास. पण मुलींना सॅनिटरी पॅड उपलब्ध झाले, तर या शिक्षणाच्या समस्येवर काहीअंशी मात करता येईल. याच अनुषंगाने झेप प्रतिष्ठानतर्फे या मुलींना पॅडचे वाटप करण्यात आले. यापुढेही आदिवासी पाड्यात अशाचप्रकारचा उपक्रम राबविण्यात येणार असून, इको फ्रेंडली सॅनिटरी पॅडचा पर्याय उपलब्ध करून देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विकास धनवडे यांनी सांगितले.
---------