शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:19+5:302021-08-18T04:47:19+5:30

------------ कोरोनाचे ३२ रुग्ण कल्याण : केडीएमसी हद्दीत मंगळवारी कोरोनाचे नवीन ३२ रुग्ण आढळून आले; तर, उपचाराअंती ८२ रुग्णांना ...

Distribution of school materials | शालेय साहित्य वाटप

शालेय साहित्य वाटप

Next

------------

कोरोनाचे ३२ रुग्ण

कल्याण : केडीएमसी हद्दीत मंगळवारी कोरोनाचे नवीन ३२ रुग्ण आढळून आले; तर, उपचाराअंती ८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नव्या रुग्णांची भर पडल्याने सध्या ४७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या ‘केडीएमसी’च्या हद्दीत एक लाख ३६ हजार ९६८ इतके रुग्ण बरे झाले आहेत.

--------------------

आज लस नाही

कल्याण : सरकारकडून लसीचा साठा उपलब्ध होऊ न शकल्याने बुधवारी केडीएमसी हद्दीत महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोविड लसीकरणाची सुविधा बंद राहील, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे.

--------------------------------------

ग्रीन रेस स्पर्धेचे आयोजन

कल्याण : वृक्षसंपदेची ओळख व गोडी वाढविण्यासाठी महापालिका आणि न्यास ट्रस्ट, डोंबिवली यांच्यातर्फे २६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत ग्रीन रेसचे आयोजन करण्यात आले आहे. २६ ऑगस्टला याबाबत मार्गदर्शन सत्र घेण्यात येणार आहे. हा उपक्रम कल्याण येथील वनस्पतितज्ज्ञ डॉ. श्रद्धा शिंपी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला आहे.

-----------------

Web Title: Distribution of school materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.