जि.प.कडून वंचितांना भांड्यांसह स्कूटी-भजन साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:47 AM2021-08-20T04:47:09+5:302021-08-20T04:47:09+5:30
ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज जगण्याचा संघर्ष करणाऱ्या वंचित ग्रामस्थांना ठाणे जिल्हा परिषदेने आधार दिला आहे. समाजकल्याण ...
ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज जगण्याचा संघर्ष करणाऱ्या वंचित ग्रामस्थांना ठाणे जिल्हा परिषदेने आधार दिला आहे. समाजकल्याण विभागाने मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांना मंगळवारी भजन साहित्य, सतरंजी, भांडी, साउंड सिस्टीम, डीजे, स्कूटी आणि पुस्तकांचे वाटप करून कोरोनाच्या या काळात त्यांना जगण्याचा आधार दिला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, आमदार किसन कथोरे, उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. भांडी वाटपातून सामूहिक कार्यक्रमांसाठी मदत होण्यासाठी व पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानवृद्धीत करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पंचायत समितीचे सभापती दीपक पवार, उपसभापती स्नेहा धनगर, जिल्हा परिषदेचे सदस्य किसन गिरा, रेखा कंटे, पंचायत समितीचे सदस्य अनिल देसले, विष्णू घुडे, पद्मा पवार, सीमा घरत आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, आमदार किसन कथोरे यांचीही भाषणे झाली
- ग्रामस्थांचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न : सुभाष पवार
जिल्ह्यातील ग्रामस्थांचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून केला जात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख उपक्रम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातून तळागाळातील वंचित ग्रामस्थांना सुविधा निर्माण केल्या जात आहेत, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले.
--------------