जिल्ह्यात १०९ बालके तीव्र कुपोषित
By admin | Published: March 15, 2017 02:31 AM2017-03-15T02:31:48+5:302017-03-15T02:31:48+5:30
जिल्ह्यात सद्यस्थितीला तीव्र कुपोषित (सॅम ) १०९ बालके तर मध्यम कुपोषित ६४९ अशी ७५८ बालके कुपोषणाने पिडीत आहेत.
ठाणे : जिल्ह्यात सद्यस्थितीला तीव्र कुपोषित (सॅम ) १०९ बालके तर मध्यम कुपोषित ६४९ अशी ७५८ बालके कुपोषणाने पिडीत आहेत. या बालकांप्रमाणेच गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुले आदींना वेळेत पुरक पोषण आहार भरपूर प्राप्त करून देण्याचे आदेश टास्क फोर्स समितीच्या बैठकीत उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम यांनी मंगळवारी दिले.
कुपोषण निर्मुलनअंतर्गत टास्क फोर्स समितीची बैठक मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्यातील दुर्धर आजारी मुलांना व वयानुसार वजन केलेल्या मुलांना पोषण आहार पुरवठ्यासंदर्भात बैठक घेतली जाते त्यात हा आढावा घेतला. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीचादेखील आढावा यावेळी घेण्यात आला. सहा महिने ते तीन वर्षाची बालके, सहा वर्षाचे बालके आदींना मिळत असलेल्या आहारपुरवठ्याची खात्री यंत्रणांनी करावी अशा मार्गदर्शन सूचनांवर या बैठकीत चर्चा झाली.
यावेळी गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडून प्राप्त झालेल्या जन्म मृत्यू नोंदणी विषयक व जीवनविषयक तपशीलाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
दुर्धर आजाराची लागण झालेल्या मुलांना कशा प्रकारे मदत करता येईल, याबाबत चर्चा झाल. तसेच रेशनदुकानदांराकडून नियमित काही बचत गटांकडून गहू व तांदूळपुरवठा सॅम व मॅम कुटूंबाकडे धान्य उपलब्ध होतो की नाही याबाबत संबधितांना सूचना देण्यात आल्या. या बठकीला विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)