जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे २७६ रुग्ण, ५३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:12+5:302021-07-08T04:27:12+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत २७६ रुग्ण आढळले असून त्यात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत २७६ रुग्ण आढळले असून त्यात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील २१ रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात हलविले असून १५० रुग्णांना यशस्वी उपचार करून घरी सोडले आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार करण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिला आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये किंवा ज्यांना उच्च मधुमेह आहे, अशांना या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले. परंतु, आता ज्यांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशांनादेखील या आजाराची लागण होण्याच्या शक्यता नाकारता येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या जिल्ह्यात ५२ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.