ठाणे : जिल्ह्यात ११ महिन्यांत ६३ बालमृत्यू: गतवर्षीच्या तुलनेत प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:21 AM2018-02-12T01:21:32+5:302018-02-12T01:22:08+5:30
ठाणे जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच पाऊले उचलत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या उपक्रमांना यश येत असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण ४४ ने घटले आहे. या वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारी या अकरा महिन्यांत ६३ बालकांचा मृत्यू झाला आहे. शहापुरात वाढलेले बालमृत्यूचे प्रमाण एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ३४ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच पाऊले उचलत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या उपक्रमांना यश येत असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण ४४ ने घटले आहे. या वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारी या अकरा महिन्यांत ६३ बालकांचा मृत्यू झाला आहे. शहापुरात वाढलेले बालमृत्यूचे प्रमाण एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ३४ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात एकूण सात तालुके असून, चार तालुक्यांचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. मात्र, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तीन तालुक्यांमध्ये बहुतेक भाग हा ग्रामीण असून, त्यामध्ये आदिवासी भागही आहे. या तालुक्यांत गतवर्षी (एप्रिल १६ ते मार्च १७) १०७ बालमृत्यूू झाला होता. कमी असलेले वजन, जुळी जन्माला येणारे बालके, अपघात, सर्पदंश, जन्मजात अपंग अशी एक नव्हेतर ४५ कारणांमुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हीच लक्षात घेऊन हे बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाला त्या कारणावर चर्चा करून मुळाशी जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आदिवासी भागात जन्मला येणाºया बालकांची आरोग्य विभागाद्वारे नियमित लसीकरण, तपासणी, मानव विकास शिबीर घेऊन बालरोग तज्ज्ञांमार्फत उपचार, तसेच सॅम आणि मॅम बालकांची १५ दिवसांनी तपासणी तसेच बालक-पालकांच्या सभा आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी गाभा समितीची दर तीन महिन्यांनी होणारी बैठक दरमहा होेत आहे.
जिल्हाधिकाºयांच्या बैठकीत मिळाली माहिती-
फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या गाभा समितीच्या बैठकीत एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान, जिल्ह्यात ६३ बालकांचा मृत्यू झाला असून, ही आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत ४४ ने घटल्याचे समोर आले. जिल्ह्यात बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण शहापुरात ७८ होते. त्यापाठोपाठ मुरबाड-१५ आणि भिवंडी-१४ होते. यंदा शहापुरात बालमृत्यूचे प्रमाण ४४ एवढे आहे. भिवंडीत ९ ने प्रमाण कमी होऊन यंदा ५ बालकांचा मृत्यू झाला आहे. मुरबाडमध्ये एकने हे प्रमाण घटले असून, या वर्षात १४ बालक दगावल्याची माहिती सूत्रांनी दिली.