मतदानासाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:07 PM2019-04-24T23:07:34+5:302019-04-24T23:07:56+5:30

मतदारांमध्ये केली जागृती, हाउसिंग सोसाट्यांतदेखील जनजागृती

The district administration was ready for voting | मतदानासाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज

मतदानासाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज

Next

पालघर : पालघर मतदार संघात निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदार जागृती अभियानाअंतर्गत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याद्वारे आतापर्यंत तेरा लाखांहून अधिक म्हणजेच सुमारे 70 टक्के मतदारांपर्यंत पोहोचण्यात जिल्हा निवडणूक यंत्रणेला यश आले असून सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

पालघर जिल्ह्यात मतदार जागृती कार्यक्र मांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यात आले आहेत. यामध्ये उद्याचे मतदार असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व समजावून देण्याबरोबरच पालकांना पत्र लिहून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सुमारे साडेचार लाख विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले.

अन्य उपक्र मांमध्ये सुमारे 50 हजार मतदारांकडून मी कुठल्याही आमिषांना बळी न पडता मतदान करेन असे संकल्प पत्र भरून घेण्यात आले आहे. हा उपक्रम विक्रमगड विधानसभा मतदारसंघासह डहाणू, बोईसर, पालघर, वसई, नालासोपारा या सर्वच मतदारसंघात राबविण्यात आला.

विशेष मतदार नोंदणीच्या मोहिमेद्वारे 27 हजार 822 युवा मतदार जोडले गेले असून यासह आॅनलाइन नोंदणीच्या सुविधेमुळे जिल्ह्यात एकूण 72 हजारांहून अधिक नवीन मतदार निवडणूक प्रक्रि येमध्ये सहभागी झाले आहेत. पालघर जिल्ह्यात मी मतदान करणारच या सह्यांच्या मोहिमेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तर जव्हार, डहाणू, बोईसर, वसई अशा विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मानवी साखळीमध्ये सुमारे आठ हजार मतदार सहभागी झाले. यामध्ये जव्हार येथे मानवी साखळीद्वारे लक्षवेधक असा भारताचा नकाशा तयार करण्यात आला. चार एकर क्षेत्रात 500ङ्ग350 फूट आकाराच्या या मानवी साखळीत 2500 विद्यार्थी सहभागी झाले.

मानवी साखळीच्या अन्य उपक्रमांमध्ये विक्रमगड येथे मेणबत्त्यांची रांगोळी, डहाणू, बोईसर येथे समुद्रकिनारी मानवी साखळी, पालघर, वसई येथे दौड अशा विविध उपक्र मांचा समावेश होता. जिल्ह्यात विविध शासकीय बिलांच्या पानांवर मतदार जागृतीचे शिक्के मारून आतापर्यंत साडेनऊ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचिवण्यात आले आहेत.

तर सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात विशेषत: वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 3हजार 700 गृहनिर्माण संस्थांमधील एक लाख 71 हजार मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यात आली आहे. जिल्ह्यात 18 लाख 85 हजारांहून अधिक मतदार असून सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आयोगाने सुटी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी दोन तासांची सवलत देण्याचे आवाहन करण्यात आले असून सर्व मतदारांनी येत्या 29 एिप्रल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

Web Title: The district administration was ready for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.