कल्याणच्या अवैध रेती उपशावर जिल्हा प्रशासनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:57 PM2020-12-14T16:57:21+5:302020-12-14T16:59:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्हयातील अवैध रेती उपसा करणाऱ्या वाळू माफीयांविरुद्ध ठाणे जिल्हा प्रशासनाने जोरदार मोहीम सुरु केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्हयातील अवैध रेती उपसा करणाऱ्या वाळू माफीयांविरुद्ध ठाणे जिल्हा प्रशासनाने जोरदार मोहीम सुरु केली आहे. कल्याण येथील रेती बंदरावर अनधिकृतपणे रेती उपसा करणाºया टोळीकडून रेतीने भरलेल्या ट्रकसह सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईमध्ये ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात मोठया प्रमाणात विविध ठिकाणी अनधिकृतपणे रेती उपसा करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. दरम्यान ‘लोकमत’मध्येही यासदंर्भात ‘रेतीमाफियांच्या वाळू उपशामुळे कांदळवनावर आले गडांतर’ या मथळयाखाली ३० नोव्हेंबर रोजी वृत्त ‘रिअॅलिटी चेक’ द्वारे वृत्त प्रसिद्ध केले होते. याचीच गांभीर्याने दखल घेत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर
अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या निर्देशानुसार कल्याण येथील रेतीबंदरावर ठाण्याचे रेतीगट तहसिलदार मुकेश पाटील आणि कल्याणचे तहसिलदार दीपक आकडे यांनी १२ डिसेेंबर २०२० रोजी आपल्या पथकासह कारवाई केली. या कारवाईमध्ये रेतीबंदरावर अनधिकृतपणे रेती उपसा करणारी सुमारे पाच लाख रुपये किंमतीची क्रेन, सुमारे दोन लाखांचा इंजिन पंप आणि अंदाजे दहा लाख रुपये किंमतीची ३० ब्रास रेती जागीच जप्त करण्यात आली. या कारवाईच्या वेळी रेतीने भरलेला ट्रकही जप्त केला असून या ट्रकच्या मालक आणि चालकाविरूध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसीलदार मुकेश पाटील यांनी दिली.
* वर्षभरात १२ ठिकाणी कारवाई
रेती गट विभागासह तहसीलदार विभाग यांनी १ जानेवारी ते १४ डिसेंबरपर्यंत १२ ठिकाणी अवैद्य रेती उपशाबाबत कारवाई करीत पाच गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सक्शन पंप, बार्ज, बोटी आणि क्र ेन अशी कोटयवधींची यंत्रसामुग्री जप्त तसेच नष्ट केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
*अवैधरित्या होणाºया गौण खनिजाच्या उत्खननामुळे सरकारचा महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. शिवाय खाडीतून वाळूचाही बेकायदा उपास केला जात असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. वाळूच्या उपशासाठी कांदळवनाचा ºहास केला जातो. अशा कारवाईसाठी पथक खाडी पात्रात धडकल्यानंतर वाळू तस्कर आधीच पळून जातात. अनेक कारवाईमध्ये आरोपीचा काहीच थांगपत्ता लागत नाही. त्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथील खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती उपसा सुरु असल्याबाबात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्र ारी प्राप्त झाल्या होत्या. त्याच तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.